पुण्यातील दुदैवी घटना, महापालिका सफाई कर्मचारी, पाच भगिनिंचे कोरोनामुळे दुदैवी निधन
पुणे;- पुणे महानगरातील दुदैवी घटना पुणे मनपाच्या सफाई कर्मचारी उमा पाटोळे (भवानी पेठ), शोभा पाटोळे (धनकवडी), रंजना चव्हाण (भवानी पेठ), शंकुतला सालेकर (घोले रोड) आणि कमला नेहरू रुग्णालयातील आया- नंदा साठे यां पाच माता भगिनींचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला ही बाब अत्यन्त चिंताजनक असून संघटनेच्या वतीने शोक व्यक्त करत सफाई कामगार युनियनचे महाराष्ट्र ग्रामीण अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी चिंता व्यक्त केली आहे, तसेच पुणे मनपात पाचही भगिनींचे निधनामुळे चिंतेच वातवरण झालेली असल्याचे विठ्ठल पवार राजे यांनी प्रशिदीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अखिल भारतीय सफाई कामगार संघटना नवी दिल्लीचे वतीने तातडीने शेखर गायकवाड पुणे मनपा आयुक्त यांना ओनलाईन निवेदन देऊन व विठ्ठल पवार राजे प्रदेश ग्रामीण अध्यक्ष व मा धानराज चावरीया प्रदेशशहर अद्यक्ष लवकरच भेटनार आहेत.
संघटनेने याआगोदरच प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, चिफ सेक्रेटरी यांना पत्र लिहून आरोग्य, सफाई कर्मी, सिसस्टर्स, सेविका, डॉक्टर यांचे कुंटूंबाना किमान 50 लाखाचा, विमा आरोग्य किट, सुविधा उपलब्ध करून द्यव्यात अशी विनंती केलेली आहे, तृतीया व चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांना सेवा सुविधा मिळत नाहीत अशा तक्रारी आलेल्या आहेत, आजही हडपसर, वाडगावंशेरी, भवानी पेठ व पिपरी चिंचवड मनपा, नगरपालिका, नागरपंच्यात येथे व ग्रामपंचात एत्ररत्र ही सफाई करमिना सुविधा मिळत नाहीत, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या भेट घेणार असून आरोग्य कर्मीच्या इतर मागण्यांबाबत राष्ट्रीय पातळीवर मा विजयकुमार चर्चा करतील.