अर्धवट जळालेल्या कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके
हाजीपूर, : देशातील कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. मृतांचा आकडा पाहून लोकांमध्ये भीती वाढत आहे. त्यातच कोनहारा घाटावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेहाचे कुत्रा आणि कावळे लचके तोडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
स्थानिकांनी यामागे सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. गुरुवारी कोरोना रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र तो मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सोडून देण्यात आला. त्यामुळे कुत्रे आणि कावळे हे अर्धवट जळलेला मृतदेह खात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावेळी स्थानिकांची मोठी गर्दी जमा झाली आणि त्यांनी गोंधळ घातला.
कोनहारा घाटावर दुकान चालविणाऱ्या कुंती देवी यांनी सांगितले की, कोरोना रुग्णाचा मृतदेह येथे जाळण्यात आला. मात्र पूर्णत: जळाला नाही. त्यामुळे कावळे आणि कुत्रे मृतदेह कुरतडत असल्याचे समोर आले. स्थानिकांनी याबाबत सदर रुग्णालयाला कळवले. त्यानंतर आरोग्य व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र सरकारने स्थानिकांचा दावा चुकूचा सांगून हा मृतदेह कोरोना रुग्णाचा नसल्याचे सांगितले आहे. सिव्हिल सर्जन इंद्रदेव रंजन यांनी सांगितले की कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अर्धवट जळलेला हा मृतदेह कोरोना रुग्णाचा नसून दुसऱ्या व्यक्तीचा असल्याचे सांगण्यात आले.