राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल ची आबालवृद्धांसाठी सेवा

पुणे: कोरोना विषाणू साथीच्या तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे सेवाकार्य सुरूच असून आज शुक्रवारी सातव्या दिवशी विविध ठिकाणी झालेल्या वैद्यकीय शिबिरात ११७४ आबालवृद्ध रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
शुक्रवार दि.२२ मे २०२० रोजी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉ.सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या सर्व पदाधिकारी आणि पुणे महानगरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून अतिशय काटेकोर पद्धतीने सुरू असलेल्या डॉक्टर आपल्या दारी अभियाना अंतर्गत पुण्यातील विविध कंटेन्मेंट,रेड झोनप्रमाणे इतरही क्षेत्रात ११७४ हून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले.एकूण ५ ऍम्ब्युलन्ससह कोव्हीड योद्धा डॉक्टर्स कार्यरत होते.
माजी नगरसेविका सुरेखा कवडे यांच्या सहकार्याने बीटी कवडे रोड परिसरात डॉ.विक्रम सुपुगडे,डॉ.सुहास लोंढे,डॉ नितीन वाघमारे,डॉ सतिष सोनवणे ह्या डॉक्टरांनी २२५ रुग्णांची तपासणी करून औषधे वाटप केली यावेळी एक संशयित रुग्ण आढळून आला.
श्रीनाथ म्हसोबा मंदिर,घोरपडी उद्यान,११७ घोरपडी पेठेत सौ शिल्पा भोसले यांच्या सहकार्याने डॉ मोहन ओसवाल,डॉ नितीन पाटील,डॉ सुरेश पाटील यांनी 210 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.
पर्वती दर्शन येथे नितिन कदम यांचे सहकारी प्रशांत कदम,सचिन गायकवाड, संकेत शिंदे यांच्या मदतीने डॉ राजेंद्र जगताप,डॉ सचिन ढमाले,डॉ गणेश निंबाळकर,डॉ नितीन ढुमणे,डॉ प्रदीप उरसळ यांनी २८० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप केले.
त्यात एकूण ५ संशयित रुग्ण आढळले आहेत ज्यांची पुढे पालिकेच्या डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.
बिबवेवाडी येथील लोअर इंदिरा नगर,शनी मंदिरामागे अभिजित उंद्रे,संतोष पासलकर यांच्या सहकार्याने डॉ अनुपमा गायकवाड,डॉ मयुरा टेकाडे,डॉ कल्पना जाधव,डॉ दिनेश बाऊस्कर यांनी १०९ रुग्णांना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले. या शिबिरातून एकूण १२ कोमॉर्बीडीटी म्हणजे रिस्क फॅक्टर जास्त असलेले रुग्ण वेगळे काढण्यात आलेत, कार्पोरेशनकडून ज्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
चंदन नगर परिसरातील, नवग्रह मंदिराजवळ बिडी कामगार वसाहतीत नगरसेवक भैय्यासाहेब जाधवांच्या सहकार्याने डॉ राजश्री पोखरणा,डॉ दत्ता भोसले,डॉ भाऊसाहेब जाधव टीमने ३५० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप केले यावेळी ३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
या अभियानात डॉक्टरांकडून पीपीई किट,थर्मल गन द्वारे,फेस शिल्ड,सोशल डिस्टन्सिंगचे सर्व निकष पाळले जात आहेत.डॉ.सुनिल जगताप यांच्या निर्देशानुसार ठरल्याप्रमाणे शिबिरातून अधिकाधिक रुग्ण वेगळे मनपाच्या डॉक्टरांकडून त्यांची तपशीलवार पुन्हा तपासणी केली जावी या अनुषंगाने पृथक्करण करण्यात येत आहे. यात विशेषतः वयोवृध्द,डायबेटिक,हायपरटेन्शन,श्वसन विकार इ.कोमॉर्बीडीटी रिस्क जास्त असलेले रुग्ण आहेत.