महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान निधीस आर्थिक मदत
पुणे : महाराष्ट्र वीरशैव सभा पुणेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस १ लाख २५ हजार रुपये तर पंतप्रधान सहायता निधीस ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार निधी देण्यात आला आहे. एकूण एक लाख ७५ हजार रुपयांचा निधी पुण्याच्या निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभा प्रांतिक सरचिटणीस चंद्रशेखर होनराव यांच्या हस्ते निधी देण्यात आला.
महाराष्ट्र वीरशैव सभा प्रांतिक सदस्य पंढरीनाथ लांडगे यावेळी उपस्थित होते.
चंद्रशेखर होनराव म्हणाले, महाराष्ट्र वीरशैव सभा ही महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजासाठी काम करणारी जुनी आणि शिखर संस्था आहे. संस्थेची स्थापना १९७८ साली झाली. आज महाराष्ट्रावर आणि देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. यातून सावरण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरिने मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून कोरोना सहायता निधी देण्यात आला आहे.
