कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध- आमदार सुनील कांबळे
पुणे – कोरोणामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट असून पुण्यातील झोपडपट्ट्या मध्ये अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे .त्यामुळे शासनाने या वस्तुस्थितीचा गंभीरपणे विचार करावा अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी केली आहे . ते आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करताना बोलत होते .त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळा येथे सोशल डिस्टन्स राखून सनदशीर मार्गाने शांतपणे आंदोलन केले.या वेळी त्यांच्या बरोबर चार कार्यकर्ते सहभागी होते .या वेळी शासनाच्या नाकर्तेपणा चा निषेध करण्यात आला.तसेच गरीब आणि झोपडपट्टी मधील नागरिकांना आरोग्य सेवा तत्त्तकाल उपलब्ध करून द्यावे.तसेच कर्नाटक ,आंध्रप्रदेश ,उत्तर प्रदेश सरकारने उपेक्षित लोकांना पॅकेज दिले त्याप्रमाणे महाराष्ट्रातील रिक्षावाले ,हातगाडी वाले ,मजूर ,भाजीवाले त्याप्रमाणे हातावर पोट असणाऱ्या लोकांना या शासनाने तात्काळ पॅकेज जाहीर करावे अशी मागणी आमदार सुनील कांबळे यांनी या वेळी केली .
