fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

पुण्याच्या कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने गुरुवारी १६०४ रुग्णांची तपासणी

पुणे:  कोरोना विषाणू साथीच्या  तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल चे सेवाकार्य सुरूच असून आज गुरुवारी विविध ठिकाणी झालेल्या वैद्यकीय शिबिरात १६०४  रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. तर वारजे येथील रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले . 
राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे सर्व पदाधिकारी आणि पुणे महानगरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी ‘अभियानांतर्गत पुण्यातील वेगवेगळ्या प्रभागात एकूण ६ ऍम्ब्युलन्स व डॉक्टर्स कार्यरत होते.
गुरुवार दि. २१ मे २०२० रोजी अतिशय काटेकोर पद्धतीने सुरू असलेल्या डॉक्टर आपल्या दारी अभियाना अंतर्गत पुण्यातील विविध कंटेन्मेंट, रेड झोनप्रमाणे इतरही क्षेत्रात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले.

प्रदिप उर्फ बाबा धुमाळ, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली  धुमाळ व  निवृत्ती येणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक यांच्या सहकार्याने वारजे हायवे परिसरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरा दरम्यान जवळपास ६० लोकांनी रक्तदान केले जे पुढे कोव्हीड पॉझिटिव्ह असणाऱ्या अत्यावस्थ रुग्णांसाठीच्या प्लाझ्मा थेरपी उपचारासाठी पाठविले जाणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ अजित सिंह पाटील, डॉ संगिता खेनट, डॉ प्रताप ठुबे, डॉ परशुराम सूर्यवंशी, डॉ आनंद पाटील, डॉ. झरीना शेख उपस्थित होते. यांनी एकूण ९० रुग्णांची तपासणी करून त्यातले ९ रिस्क फॅक्टर जास्त असलेले रुग्ण वेगळे काढले.

 हडपसर येथे नगरसेवक  योगेश ससाणे यांच्या सहकार्याने ससाणे नगर रोड परिसरातील गल्ली नं. १ ते १२ या भागात डॉ.शंतनु जगदाळे, डॉ. अमोल नलावडे, डॉ गणेश सातव, डॉ. लाला मोटे, डॉ. राजेश पाटील ह्या डॉक्टरांनी ४०० रुग्णांची तपासणी करून औषधे वाटप केली.

गेल्या ४ दिवसापासून पर्वती पायथ्याशी जनता वसाहत येथे सुरू असलेल्या शिबिरात सौ. प्रिया गदादे -पाटील,  शिवाजी गदादे- पाटील यांच्या सहकार्याने डॉ. रणजित निकम, डॉ. विजयसिंह देसाई, डॉ कैलास चरखा, डॉ महेश साबळे, डॉ नितीन भोईटे यांनी एकूण ५११ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. त्यात एकूण ९ संशयित रुग्ण आढळून आलेत ज्यांची पुढे पालिकेच्या डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.

बिबवेवाडी गावठाण येथील पापळ वस्ती परिसरात  सुनिल बिबवे, अभिजित उंद्रे यांच्या सहकार्याने डॉ अनुपमा गायकवाड, डॉ ज्योती तुसे, डॉ दिनेश बाऊस्कर, डॉ सागर नाईक यांनी ५५८ रुग्णांना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले. ह्या शिबिरातील एकूण २९ कोमॉर्बीडीटी म्हणजे रिस्क फॅक्टर जास्त असलेल्या रुग्णांची कार्पोरेशनकडून पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

सहकार नगर अरणेश्वर मंदिराच्यामागे टांगेवाला कॉलनी येथे  नगरसेविका अश्विनी कदम,  नितिन कदम   युवक सहकाऱ्यांच्या मदतीने डॉ राजेंद्र जगताप, डॉ गणेश निंबाळकर, डॉ. सचिन ढमाले, डॉ सौ नीलम उनावणे, डॉ उरसळ यांनी सोसायटीतील जवळपास २५० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करून कोव्हीड स्क्रिनिंग साठी त्यातल्या एका रुग्णाबाबत  कळविले.

चंदन नगर परिसरातील, बोराटे वस्ती गणेश मंदिराजवळ नगरसेवक भैय्यासाहेब जाधवांच्या सहकार्याने डॉ राजश्री पोखरणा, डॉ रुपाली दिघे, डॉ भाऊसाहेब जाधव, डॉ श्रीकांत दिघे, डॉ दत्ता भोसले टीमने ३०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून औषधी वाटप केले व स्क्रिनिंग दरम्यान संशयित एका रुग्णाला नायडू हॉस्पिटल येथे पाठविले.

या अभियानात डॉक्टरांकडून पीपीई किट, थर्मल गन द्वारे, फेस शिल्ड, सोशल डिस्टन्सिंग चे सर्व निकष पाळले जात आहेत. डॉ. सुनिल जगताप यांच्या निर्देशानुसार ठरल्याप्रमाणे शिबिरातून अधिकाधिक रुग्ण वेगळे मनपाच्या डॉक्टरांकडून त्यांची तपशीलवार पुन्हा तपासणी केली जावी या अनुषंगाने पृथक्करण करण्यात येत आहे. यात विशेषतः वयोवृध्द, डायबेटिक, हायपरटेन्शन, श्वसन विकार इ. कोमॉर्बीडीटी रिस्क जास्त असलेले रुग्ण आहेत.

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अभियानात राष्ट्रवादी डॉक्टर सेल सोबत आमदार चेतन तुपे, विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ, पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  सौ रुबल अग्रवाल, सौ अंजली जाधव, सौ वैशाली जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेल्सचे राज्य समन्वयक सुहास उभे व सहकाऱ्यांचे  योगदान लाभत आहे.मागील आठवड्यात शुक्रवारी उप मुख्य मंत्री अजित पवार यांनी या अभियानाचे उद्घाटन केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: