‘नवरी नटली’ फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत आणि ‘नवरी नटली’ फेम छगन चौगुले यांचे आज (गुरुवारी) निधन झाले. छगन चौगुले यांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यातच त्यांचे निधन झाले. ‘मांढरदेवी काळुबाईची कथा’, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’ हे त्यांचे अल्बम प्रसिद्ध होते.
