अकरावीची केंद्रीय आँनलाईन (CAP) प्रवेशप्रक्रिया यंदा शाळा,काँलेज स्तरावर राबवा
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
पुणे – इयत्ता ११वी करीता केंद्रीय आँनलाईन प्रवेशप्रक्रिया शालेय शिक्षण शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत आँनलाईन पध्दतीने राबविले जाते. सध्या कोरोनाचे संकट बघता शैक्षणिक वर्षे 2020 – 21 करीता 11 वीची प्रवेशप्रक्रिया राबविताना प्रशासनावरील ताण कमी करावा आणि शाळा, काँलेज स्तरावर प्रवेशप्रक्रिया रावाबण्यात यावी, अशा प्रकारचे नियोजन करण्याची सूचना, आदेश शाळा काँलेजांना द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विवेक बनसोडे यांनी पत्रात म्हटले आहे की, इयत्ता १०वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता ११वी करीता केंद्रीय आँनलाईन प्रवेशप्रक्रिया शालेय शिक्षण शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत आँनलाईन पध्दतीने राबविले जाते शिक्षण खात्यामार्फत आँनलाईन प्रवेशाकरीता दिली जाणारी पुस्तिका अद्याप विद्यार्थीना दिली गेली नाही पुस्तिका वाटपाचे नियोजन ही झालेल दिसत नाही दरवर्षी इयत्ता ११ वी प्रवेशाच्या किमान १ ते १० फेर्या होत आसतात शेवटच्या विद्यार्थीस प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आँनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविले जाते सध्याच कोरोणाच संकट पाहता अधिकारी कर्मचारी कमी वेळात ही प्रवेशप्रक्रिया राबवू शकतील का? हा प्रश्न निर्माण होतो. कमी वेळ त्यात शासन प्रशासन कोरोना रोगाच प्रसार होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहे अशात या सर्व बाबीचा विचार करूण चालू शैक्षणिक वर्षे 2020 ते 2021 करीता प्रवेशप्रक्रिया राबविणे गरजेचे आसल्याने यंदा प्रशासनावरील ताण कमी करुण शाळा, काँलेज स्तरावर प्रवेशप्रक्रिया राबविली जावे अशा प्रकारचे नियोजन करण्याची सूचना आदेश शाळा काँलेजांना द्यावी ही नम्र विनंती