fbpx
Saturday, December 2, 2023
MAHARASHTRAPUNE

सुवर्णयुग सहकारी बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता ११ लाख रुपयांची मदत

पुणे : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बँकेच्या कर्मचा-यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री आपत्ती निवारण सहायता निधीमध्ये दिले आहे. या रकमेत बँकेनेही योगदान देत एकूण ११ लाख रुपयांची रकमेचे या निधीमध्ये योगदान दिले आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे या मदतनिधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, इंद्रजीत रायकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात सुवर्णयुग सहकारी बँकेचे मुख्यालय, २२ शाखा, दोन विस्तारित कक्ष, २० एटीएम च्या माध्यमातून वित्तीय सेवा पुरवल्या जात आहेत. तसेच मोबाइल बँकिंग, एटीएम, यूपीआयद्वारे सेवा देणे सुरूच आहे. 
राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, बँकेत येणा-या ग्राहकांना सॅनिटायझर देणे, फिजिकल डिस्टन्स राखणे अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत सुवर्णयुग सहकारी बँकेने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. सोबतच निवारा, डेव्हिड ससून अनाथ-दिव्यांग गृह, ठोसरपागा येथे अन्नधान्य आणि कडधान्याचे वाटप केले आहे. यापुढेही गरजूंना व शासनाला आवश्यक मदत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: