fbpx

वर्तमानपत्रे वितरित करनाऱ्या विक्रेते बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुणे – वृत्तपत्र हे बातम्या व माहिती पुरवण्याचे प्रभावी माध्यम असुन वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो या अफवेमुळे गेली कित्येक दिवस वृत्तपत्राची छपाई बंद आहे.यामुळे कित्येक विक्रेते आणी वृत्तपत्र कामगारांचे व्यवहार बंद असल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आलीय.अशा या संकटसमयी परिस्थिती प्रभाग क्र.८ औंध-बोपोडीच्या नगरसेविका व रिपाई गटनेत्या सौ.सुनिता परशुराम वाडेकर व मित्र परिवार नेते परशुराम वाडेकर
रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) गटाच्या वतीने औंध,बोपोडी, खडकी,दापोडी,फुगेवाडी येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना पहाटे पाच वाजता अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले गेले.


“कोरोनाच्या महाभयंकर काळात पेपरविक्रेते व कामगारांचा वृत्तपत्रामुळे कोरोनाची लागण होते या अफवेमुळे व्यवसाय ठप्प झालय.वृत्तपत्र ही प्रत्येक नागरिकाची गरज आहे.काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रे सुरु झालीत पण आपला जीव धोक्यात घालुन हे वृत्तपत्र विक्रेते व कामगार दारोदारी जावुन पेपर वितरण करतात. त्यामुळे त्यांचे कौतुकही केले पाहिजे आणी शासनाचेही लक्ष याबाबत वेधले गेले पाहिजे” असे रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (आ) चे नेते परशुराम वाडेकर म्हणाले.
या वाटप प्रसंगी हिन्दुस्तान टाइम्सचे अधिकारी अभय सर,टाइम्स ऑफ़ इंडियाचे अधिकारी पनीकर,वितरण पर्यवेक्षक कोळेकर,लोकमतचे वितरण अधिकारी आदित्य पवार तसेच स्थानिक वृत्तपत्र विक्रेते भिमराव वाघमारे सुभाष पवार,भाऊसाहेब डोळस,अनिल संम्युअल,अनिल स्वामी,जितेंद्र मोरे,औदुंबर,विजय तडके,संतोष कांबळे,तसेच अनेक पेपर विक्रेते उपस्थित होते.व
जेष्ठ छायाचित्रकार विजय सोनिगरा,नितीन जाधव,
सामाजिक कार्यकर्ते’ शहाबुद्दीन काझी,अनिल शिंदे अविनाश कदम, आप्पासाहेब वाडेकर बाळासाहेब मोरे,अनिल जोशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: