अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी क्वारंटाईन
बॉलिवुड मधून उत्तरप्रदेशातील आपल्या बुधना या मूळ गावी पोचलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला तेथील पोलिसांनी चौदा दिवस क्वारंटाईन ठेवले आहे. सिद्दीकी हा आपल्या कुटुंबीयांसह महाराष्ट्र पोलिसांची आवश्यक ती अनुमती घेऊन उत्तरप्रदेशात आपल्या गावी ईदसाठी आला आहे. त्याच्यासह त्याच्या कुटुंबाची करोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आढळून आली आहे. परंतु दक्षतेचा उपाय म्हणून त्याला कुटुंबीयांसह चौदा दिवसाच्या क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याला आपल्या वडिलोपार्जित घरातच क्वारंटाईन ठेवण्यात आले असून पुढील चौदा दिवस आता तो कोणालाही भेटणार नाही असे त्याचा भाऊ अयाजुद्दीन सिद्दीकी याने पत्रकारांना सांगितले. केवळ ईद साजरी करायची म्हणून तो येथे आला आहे.
