Saturday, May 30, 2026
PUNE

लीला पुनावाला फाऊंडेशन तर्फे पुण्यातील ७५० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती प्रदान

पुणे, दि.१५ – अभियांत्रिकी (पदवी ४ वर्ष किंवा डिप्लोमा नंतर ), फार्मसी आणि नर्सिंग मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना लीला पुनावाला फाऊंडेशन ने (एलपीएफ) नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. पुण्यातील गुणवंत परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. गुणवत्तेसह गरज या निकषावर एलपीएफ गरजू मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करते. कोविड -१९ च्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेले प्रतिबंधक प्रोटोकॉल लक्षात ठेवून यावर्षी शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन तीन दिवसांत आणि ६ कार्यक्रमांमध्ये करण्यात आले होते. एलपीएफचे कॉर्पोरेट भागीदार, विश्वस्त मंडळ आणि शिष्यवृत्ती निवड समिती सदस्यांच्या हस्ते या  विद्यार्थीनींना    शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा पद्मक्षी लीला पुनावाला म्हणाल्या की, २५ व्या वर्षात पदार्पण करत एलपीएफ ने ११,००० पेक्षा जास्त मुलींच्या सशक्तीकरणाचा टप्पा गाठला आहे. आमचे कॉर्पोरेट भागीदार आणि हितचिंतकांच्या योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते. या कॉर्पोरेट भागीदारांनी प्रोजेक्ट फंडिंगच्या पलीकडे जाऊन मुलींसाठी सर्वसमावेशक भागीदारी, त्यांच्या कर्मचार्‍यांची स्वयंसेवा, अनुभवींचे मार्गदर्शन आणि इंटर्नशिप प्लेसमेंटच्या संधीं उपलब्ध करून दिल्या. एलपीएफला भारताच्या नकाशावर बघण्याचे आमचे स्वप्न आहे. जेणेकरून पात्र मुलींना व्यावसायिक शिक्षण आणि करिअरच्या आकांक्षा बाळगण्याची संधी मिळेल.

एलपीएफने आपल्या संपुर्ण प्रवासात केवळ पुण्यातच नव्हे तर वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि तेलंगणा येथे देखील शिष्यवृत्ती दिली आहे. एलपीएफच्या बर्‍याच माजी मुली आज यशस्वी महिला बनल्या आहेत, आज त्या कॉर्पोरेट, शैक्षणिक आणि जगभरातील नामांकित संस्थांमध्ये कार्यरत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading