राऊंड टेबल इंडिया आणि श्री गुरु कृपा फाउंडेशन कडुन रेल्वे पोलिस दल आणि कर्मचार्यांना मास्क वाटप
पुणे, दि . १८ – राऊंड टेबल इंडिया ही गैर राजनैतिक व सांप्रदायिक तत्वावर कार्य करणाऱ्या तरुण सदस्यांची संस्था आहे. या सदस्यांचे उद्दीष्ट आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्य, सेवा, फेलोशिप, समाजकार्य आणि सत्कार्यास प्रोत्साहन देणे. श्री गुरू कृपा फाउंडेशनच्या सहकार्याने आज राऊंड टेबल इंडिया (चाप्टर १७७ आणि १४४) ने पुणे रेल्वे स्थानकाचा ८०, ००० चौरस फुटांच्या एरिया स्वछ आणि सैनिटाइज केला आहे.
यावेळी राऊंड टेबल इंडियाच्या सदस्यांनी संपूर्ण पुणे रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलिस दल आणि त्यांच्या गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना फेस मास्कचे वाटप देखील केले.आरटीआय-पीएसआरटी -१७७ चे विद्यमान अध्यक्ष रिषी बावेजा, हसमीत सिंग, राहुल वाधवा, रोनक गांधी (सचिव), प्रतीक सिंघल, राहुल जैन आणि संतोष सिंह यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आरटीआय-पीएसआरटी -१७७ चे अध्यक्ष रिषू बावेजा म्हणाले, “पुणे रेल्वे स्टेशनची स्वच्छता आणि सैनिटाइजेशन करणे आमच्यासाठी समाधानची गोष्ट आहे. हे स्टेशन आमच्या शहराचे एक प्रमुख प्रवेशद्वार आहे. या प्रकल्पाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. याचबरोबर प्रवाशांना आणि रेल्वे पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टिकनातून मास्क देखील वितरिण देखील करण्यात आले ”
