Monday, August 31, 2026
ENTERTAINMENT

Movie Review – रात अकेली हैं

काळोखात घडणाऱ्या घटनांचे तसे प्रत्यक्षदर्शी फार कमी असतात, मात्र तेंव्हा नेमके काय घडले हे जाणून घ्यायचे कुतूहल सर्वांनाच असते. एका महालात ज्याचं लग्न आहे अशा ठाकूर रघुबीर सिंग या धनाढ्य आणि सत्तेच्या अगदी जवळ असणाऱ्या इसमाची हत्या होते. या रात्री घडलेल्या हत्येचा संदर्भ घेत तिच्याशी अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या अनेक रात्रींची चित्तथरारक कहाणी सांगणारा ‘रात आकेली है’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. रॉनी स्क्रुवाला या सर्जनशील निर्मात्याने ‘रात अकेली है’ ची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचे वैशिष्ट्य सांगायचे तर भारतात सर्वाधिक गाजलेली वेबसिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स ची साठी लेखन करणाऱ्या स्मिता सिंग यांनी ‘रात अकेली हैं’ साठी कथा, पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. त्यामुळे मास्टरपीस बनवताना त्याला द्यायचा तो कथानकाचा भक्कम आधार या चित्रपाटाला मिळत, त्यामुळे अडीच तास चालणारा खुनाचा तपास आपल्याला स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रत्येक पात्रावर संशय घ्यायला भाग पाडतो. मुख्य भुमिकेत असणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीने आपले पात्र हे नेहमी प्रमाणेच उत्तम रंगवले आहे. इन्स्पेक्टर जटिल यादवच्या अंगी असणारा बाणेदारपणा, तत्वनिष्ठा “डरते नही है हम किसींसे, चाहे जो हो जाय सच तो हम पता करके रहेंगे” ही वृत्ती त्याच्या व्यक्तिमत्वातील रग दाखवून देते. शिवाय इला अरुण, राधिका आपटे, तिगमांशू धुलिया, आदित्य श्रीवास्तव यांसारख्या मातब्बर कलाकारांबरोबरच नवोदित कलाकार म्हणजेच श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, शिवानी रघुवंशी, रिया शुक्ला यांनी भूमिकेला न्याय दिल्याचे दिसते.

चित्रपटाची ऋण बाजू सांगायची तर चित्रपटातील थरार बघताना त्याला उत्तम पार्श्वसंगीताची जोड असायला हवी होती असे वाटत राहते. हा एकटा अपवाद वगळता ‘रात अकेली हैं’ हा आजवर भारतात बनलेल्या उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांपैकी एक म्हणून दखल घेण्याजोगा निश्चितच आहे.

चित्रपट – रात अकेली हैं
कलाकार – नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, इला अरुण, तिगमांशू धुलिया, श्वेता त्रिपाठी इ.
दिग्दर्शक – हनी त्रेहान.
लेखक – स्मिता सिंग.

रेटिंग – **** (4/5)
ओटीटी प्लॅटफॉर्म – नेटफ्लिक्स.

– प्रज्ज्वल खेडकर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading