पोलीस भरती प्रतीक्षा यादी (सन 2018) मधील उमेदवारांची निवड करा…अन्यथा ‘मातोश्री’समोर आंदोलन – संभाजी ब्रिगेड
पुणे, दि. 9 – राज्यात 2018 पासून पोलीस भरती झालेली नाही. पोलीस विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. एक मार्क कमी असल्याने शेकडो तरुणांना वेटिंगवर ठेवले आहेत. भरती झालेल्या सर्वांचे ओरिजनल कागदपत्रांची सर्व पूर्तता केलेली आहे. महत्वाची ओरीजनल कागदपत्रे पोलीस खात्याकडे जमा आहेत. मात्र त्यांना गेली अडीच वर्ष तांत्रिक कारणामुळे पोलीस विभागाने वेटिंग वर ठेवलेले आहे. यात स्पर्धेतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले व मुले असून सर्व पोलीस उमेदवारांचे राज्य सरकार प्रचंड नुकसान करत आहे. 2017 पर्यंत पोलीस भरती झाल्यानंतर (तीन वर्षाच्या आत) वेटिंग वरील उमेदवारांना सेवेत रुजू करून घेतलेलं आहे तसा सरकारचा अध्यादेश देखील आहे. मात्र 2018 नंतर पोलीस भरती झाली नसल्यामुळे अडीच वर्षात कुठलीही भरती झालेली नाही.

पोलीस भरती प्रतिक्षा यादीतील सर्व उमेदवार (सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, धरणग्रस्त, पोलीस पाल्य, माजी सैनिक व खेळाडू) आहेत. या सर्वांचा गृह विभागाने विचार करून पोलीस भरती प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांची निवड करून नोकरीवर रुजू करावे अशी विनंती आहे. परंतु राज्याचे गृहमंत्री 8000 जागांची पोलीस भरती जाहीर करतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री 10 हजार जागांची भरती जाहीर करतात. यात विसंगती असून जनतेची दिशाभूल आहे. कारण कोवीड 19 संकट पाहता अजून एक वर्ष तरी पुणे जिल्ह्यात सह इतर जिल्ह्यात लाखोच्या संख्येने तरुणांची गर्दी करू शकत नाहीत. या संकटाच्या काळात सर्व प्रक्रिया झालेले तरुण राज्यातील सर्व ठिकाणी रिक्त जागेवर सेवेत रुजू करून घेण्यात अडचण काय आहे. गृहमंत्री मा. अनिल देशमुख यांनी ती दूर करावी.
पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोविंड १९ या महामारी चा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासनावर विशेषता पोलीस दलामध्ये संख्याबळ कमी असल्यामुळे सध्या कार्यात कार्यरत असलेल्या पोलीस दलावर कामाचा मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे, व काही पोलीस कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. मागील दोन वर्षापासून पोलीस भरती सुद्धा झालेली नसल्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला लोकसंख्येच्या प्रमाणात संख्याबळ कमी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा विचार करून पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात यावे अशी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याची राज्य सरकार व गृह विभाग यांच्याकडे मागणी आहे. त्यामुळे काही प्रमाणात पोलिस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होईल. कोवीड १९ मुळे राज्यातील आर्थिक स्थिती ढासळली असल्यामुळे आता शासन कोणतीही नोकर भरती करणार नसल्याचा निर्णय शासनाने घेतल्या आहे. हा निर्णय सुद्धा दुर्दैवी आहे. त्यात पोलीस भरती भाग घेणाऱ्या उमेदवारांचे वय वाढत चालले आहे, तर काही उमेदवार वय वयोमर्यादेतून बाहेर पडत आहेत. याबाबत आम्ही ई-मेल द्वारे आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे.
पोलीस भरती प्रतीक्षा यादी (सन 2018) मधील उमेदवारांना निवड करून नोकरीत रुजू करावे अशी गृहमंत्री मा. अनिल देशमुख साहेब यांना विनंती आहे. यासाठी कृपया आपण संबंधितांना आदेश द्यावेत अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. अन्यथा प्रतीक्षा यादीतील पोलीस भरतीसाठी सर्व उमेदवारांना एकत्र करून आम्ही ऑक्टोबर महिन्यात ‘मातोश्री बंगल्यासमोर’ धरणे आंदोलन व आमरण उपोषण करणार आहोत.
आज पत्रकार परिषदेसाठी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, नम्रता वाळुंज, चला राक्षे, राहुल गर्जे, आनंद तनपुरे आदी उपस्थित होते.
