आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांवर केले ‘हे’ ट्विट !

मुंबई, दि. 5 – कोरोनामुळे बहुतांश उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे.या परिणामाने काहींनी उद्योग बंद केले,तर काहींनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत.या कामगारांची बाजू पत्रकार स्वतः रस्त्यावर उतरून मांडतोय.मात्र आज त्याच पत्रकारांवर वेतन कपात किंवा बेरोजगार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.पत्रकारांवर ओढवलेली परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत दिलासा देण्याचं प्रयत्न केला.
जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अनेक पत्रकार बंधु-भगिनींच्या नोकऱ्या गेल्याची/पगार कपात झाल्याची माहिती मिळतेय.समाजात न्यायाची बाजू मांडणाऱ्या पत्रकार बांधवांवरच न्याय मागण्याची वेळ आज आलीय.असंघटित क्षेत्रासोबतच यावरही केंद्र-राज्य सरकार समन्वयाने मार्ग काढतील,असा विश्वास वाटतो. pic.twitter.com/qJO7y8XHAP
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2020
जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अनेक पत्रकार बंधु-भगिनींच्या नोकऱ्या गेल्याची/पगार कपात झाल्याची माहिती मिळतेय.समाजात न्यायाची बाजू मांडणाऱ्या पत्रकार बांधवांवरच न्याय मागण्याची वेळ आज आलीय.असंघटित क्षेत्रासोबतच यावरही केंद्र-राज्य सरकार समन्वयाने मार्ग काढतील,असा विश्वास वाटतो,असे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या असतील त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगार कपात करीत आहेत,तर काही संस्था कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करीत आहे.त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यात लक्ष घालावे,जेणेकरून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला आधार मिळेल. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
