शंभुराजे अनाथालय येथे रक्तदान शिबिर

पुणे, दि. ५ – रशिया येथे झालेल्या द इंडिया आयकाॅन २०२० फॅशन स्पर्धेत ऊपविजेत्या हडपसरची कन्या मिस सुफिया शेख आणि युवा मराठा महासंघाचे प्रसिद्धिप्रमुख मा. गोरखभाऊ कामठे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसर येथिल शंभुराजे अनाथालय येथे रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि अनाथ मुलांना शालेयउपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक मारुती तुपे, नगरसेवक संजय शिंदे, कुराश असोसिएशन महाराष्ट्र चे सचिव शिवाजी साळुंखे, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, उद्योजक मिहिर जोशी, नील ग्रुप आॅफ कंपनीच चे ओनर नील कांबळे, परिवर्तन कला महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर पुणेकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष अनिल मोरे, जाणिव फाऊंडेशनचे रविंद्र लाड, कुराश पोलिस मित्र संघटनेचे कुणाल गायकवाड, मनसे युवा नेते सनी लांडगे, भाजपचे हवेली तालुका अध्यक्ष दुर्योधन कामठे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत बोगम, दत्तत्रय दळवी, दिलिप मोरे, सहिल शेख, विकास वाघमारे यांनी केले.
