Sunday, October 11, 2026
BusinessLatest News

स्मार्ट सिटीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि स्मार्ट पार्किंग आवश्यक – नरेंद्र गोयल

 

पुणे  : झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, अखंडित वीजपुरवठा आणि स्मार्ट पार्किंग व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे. केवळ रस्ते आणि इमारतींचा विकास पुरेसा नसून, तंत्रज्ञानावर आधारित सुविधाही शहरांना अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे मत श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटेलिपार्किंग सिस्टिम्सचे संचालक नरेंद्र गोयल यांनी व्यक्त केले.

पुणे अग्रवाल समाजाच्या वतीने १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान डेक्कन कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘प्रवाह बिझनेस एक्स्पो’च्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. उद्योग, व्यावसायिक आस्थापना आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी विश्वसनीय वीजपुरवठा आणि आधुनिक पार्किंग व्यवस्था ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.

गोयल म्हणाले की, रुग्णालये, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, औद्योगिक आस्थापना आणि निवासी संकुलांमध्ये अखंडित वीजपुरवठ्यासाठी महिंद्रा पॉवरॉल जनरेटर उपयुक्त पर्याय ठरतात. तसेच, इंटेलिपार्किंग सिस्टिम्सच्या आधुनिक उपाययोजनांमुळे मर्यादित जागेतही अधिक कार्यक्षम पार्किंग व्यवस्था उभारणे शक्य होते.

यावेळी यामिनी गोयल यांनी सांगितले की, श्याम ग्लोबल टेक्नोव्हेंचर्स जनरेटर निर्मिती आणि ऊर्जा उपाययोजनांच्या क्षेत्रात वेगाने विस्तार करत आहे. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कंपनी आपली व्यावसायिक उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.

कंपनी देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच निर्यातीच्या संधींवरही विशेष लक्ष केंद्रित करत आहे. जनरेटर निर्मिती क्षेत्रातील देशातील प्रमुख दहा उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रवाह बिझनेस एक्स्पोमध्ये महिंद्रा पॉवरॉल जनरेटरचे प्रदर्शन खुल्या जागेत करण्यात येणार असून, इंटेलिपार्किंग सिस्टिम्सचा स्टॉल क्रमांक २१२ असेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रतिनिधींना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्याबरोबरच व्यावसायिक सहकार्याच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading