Wednesday, September 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पोलीस भरतीत प्राधान्य

मुंबई : अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र सरकारच्या सेवेत संधी देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदांसाठी अग्निवीरांना प्राधान्य दिले जाणार असून, अग्निशमन दलासह इतर तत्सम सरकारी सेवांमध्येही त्यांना सामावून घेतले जाणार आहे.
अग्निवीरांसाठी प्रस्तावित भरती प्रक्रियेत परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल, तसेच वयोमर्यादेतही सवलत दिली जाणार आहे. उपलब्ध रिक्त पदांनुसार सरकारी सेवेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अग्निवीरांना संधी दिली जाणार आहे.
अग्निवीरांची पहिली तुकडी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून परतत असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे. लष्करी सेवेत मिळालेले प्रशिक्षण, शिस्त आणि अनुभव पोलीस, अग्निशमन आणि संबंधित सरकारी सेवांमध्ये उपयोगात आणण्याचा सरकारचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading