Saturday, September 19, 2026
Latest NewsPUNE

‘दगडूशेठ’ गणपतीला २५१ किलो मोदकाचा केक आणि भव्य मोतीचूर लाड़ूचा नैवेद्य 

पुणे : श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपतीला तब्बल २५१ किलो मोदकाचा केक आणि भव्य मोतीचूर लाड़ूचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. डब्लू एस बेकर्स च्या वतीने रसमलाईचा मोदकाचा केक आणि प्रभात फरसाण व दीपक केटरर्स तर्फे भव्य मोतीचूर लाडू उत्सव मंडपात आणण्यात आला होता.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षी उत्सव मंडपात हे नैवेद्य ट्रॉलीवरून आणण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नैवेद्य दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून गणेशभक्तांना याचे वाटप करण्यात आले.
डब्लू एस बेकर्स तर्फे २५१ किलोचा रसमलाई फ्लेवर चा केक बाप्पा चरणी अर्पण करण्यात आला. यावेळी डब्लू एस बेकर्स चे संचालक विकास अग्रवाल उपस्थित होते. केक अर्पण करण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. हा केक साकारण्याकरिता ४० ते ५० जणांची टीम काम करत होती, असेही त्यांनी सांगितले.
तसेच दीपक प्रभुदास मालाणी व निखिल प्रभुदास मालाणी यांच्या प्रभात फरसाण व दीपक केटरर्स यांच्या तर्फे बाप्पाला भव्य मोतीचूरचा लाडू अर्पण केला. हा लाडू इतका जड होता की त्याला फोरक्लिप वाहनांच्या साहाय्याने मंडपात आणला गेला. गेली २६ वर्षांपासून मालाणी परिवार हे कार्य करत आहे. याची सुरवात ५ किलो च्या मोतीचूर लाडू पासून झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading