अॅक्सिस पेंशन फंडचा एयूएम २०,००० कोटी रूपयांच्या पार, १५ महिन्यांत मालमत्ता दुप्पट झाली
मुंबई : अॅक्सिस पेंशन फंड या अॅक्सिस अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची (अॅक्सिस एएमसी) पेंशन फंड व्यवस्थापन शाखा आणि अॅक्सिस बँक लिमिटेडच्या उपकंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेने (एयूएम) २०,००० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. हा टप्पा त्यांच्या वाढीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे, तसेच भारतातील विना-सरकारी पेंशन क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमधील कंपनीचे स्थान अधिक दृढ करतो.
हा टप्पा व्यवसायातील प्रबळ गतीमुळे साध्य झाला आहे, ज्यामध्ये अॅक्सिस पेंशन फंडाने अवघ्या १५ महिन्यांत (जून २०२५ ते ऑगस्ट २०२६ दरम्यान) आपल्या एयूएममध्ये नवीन १०,००० कोटी रूपयांची भर घातली आहे. ही वेगाने झालेली वाढ वर्गणीदार आणि भागीदारांमधील वाढता विश्वास, वितरणाचा होत असलेला विस्तार आणि दीर्घकालीन निवृत्ती नियोजनाचा उपाय म्हणून एनपीएसचा वाढता स्वीकार दर्शवते.
अॅक्सिस बँकेच्या वितरण नेटवर्कद्वारे व्यापक एनपीएस फ्रँचायझी तयार करण्यावर विशेष लक्ष दिल्यामुळे या वाढीला पाठबळ मिळाले आहे. ग्राहक वर्ग आणि उत्पादन श्रेणींमध्ये अंमलबजावणी दृढ करत असताना या व्यवसायाने रिटेल, अफ्लूएण्ट, कॉर्पोरेट, सरकारी आणि संस्थात्मक क्षेत्रांमध्ये आपली पोहोच वाढवणे व सहभाग अधिक वाढवणे सुरू ठेवले आहे. या वैविध्यपूर्ण दृष्टिकोनामुळे अॅक्सिस पेंशन फंडाला संपूर्ण पेंशन परिसंस्थेत आपले शाश्वत अस्तित्व निर्माण करणे शक्य झाले आहे.
या यशाबद्दल मत व्यक्त करत अॅक्सिस पेंशन फंडाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. सुमित शुक्ला म्हणाले, “एयूएममध्ये २०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार करणे हा अॅक्सिस पेंशन फंडासाठी महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आमचे वर्गणीदार आणि भागीदार आमच्यावर ठेवत असलेला विश्वास यातून दिसून येतो. एयूएममधील वाढ ही व्यवसायातील गती आणि निवृत्तीचा उपाय म्हणून एनपीएसची वाढती स्वीकारार्हता दर्शवते. आम्ही अधिक विस्तार करू, तसतसे आमचे लक्ष सर्वोच्च अनुपालन मानक, सुजाण गुंतवणूक व्यवस्थापन आणि ग्राहकांची सुरक्षितता राखून पेंशन सोल्यूशन्स अधिक सोपे व सुलभ बनवण्यावर राहील.”
निवृत्ती नियोजनाबद्दल वाढती जागरूकता, ग्राहकांपर्यंत पोहोचलेला अधिक विस्तार आणि पेंशन उत्पादनांची सुलभ उपलब्धता यांमुळे भारतातील पेंशन उद्योग वेगाने विस्तारत आहे. अॅक्सिस पेंशन फंड या संधीचा फायदा घेऊन तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून एनपीएसचा स्वीकार वाढवण्यावर भर देत आहे.
अॅक्सिस पेंशन फंडाचा असाच एक उपक्रम म्हणजे तत्काल ऑनबोर्डिंग जर्नी, ज्यामुळे ग्राहकांना साधारण १५ ते २० सेकंदांमध्ये एनपीएस खाते उघडता येते. यामुळे खाते उघडण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो आणि ऑनबोर्डिंग प्रक्रिया अधिक जलद व सोपी बनते. हा पेंशन फंड हाउस पेंशनचे संरक्षण वाढवण्यासाठी आणि विविध वर्गवारीतील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएफ (मल्टीपल स्क्रिम फ्रेमवर्क), एनपीएस स्वास्थ्य आणि एनपीएस वात्सल्य यांसारख्या उपक्रमांचाही वापर करत आहे.
“आम्ही भविष्याकडे पाहतो तेव्हा आम्हाला वाढीसाठी मोठ्या संधी दिसतात. आमचे प्राधान्य तंत्रज्ञान-आधारित ग्राहक अनुभवांना प्रबळ शासन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची जोड देणे हे आहे. अंतिमतः, ग्राहकांच्या निवृत्तीच्या बचतीचे रक्षण करणे आणि दीर्घकालीन विश्वास निर्माण करणे हेच आमच्या वाढीच्या केंद्रस्थानी राहील,” असे श्री. शुक्ला पुढे म्हणाले.
अॅक्सिस पेंशन फंड विना-सरकारी पेंशन क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारी कंपनी आहे. या कंपनीची एयूएममधील जलद वाढ व्यवसायामागील वाढती गती दर्शवते. कंपनी एनपीएसची पोहोच वाढवण्यावर आणि शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे भारतातील अधिकाधिक व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित निवृत्तीचे आयुष्य घडवण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
