प्रतिक अव्हाळे, आदिती भाट, वेदांत जाधव, अनन्या शिंदे, वरद भोर, अलंक्रिता गुडूर यांचा प्रथम क्रमांक !!
पुणे : महाराष्ट्रीय मंडळाच्या शेठ दगडुराम कटारिया हायस्कूल तर्फे आयोजित कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२६ स्पर्धेत प्रतिक अव्हाळे, आदिती भाट, वेदांत जाधव, अनन्या शिंदे, वरद भोर, अलंक्रिता गुडूर यांनी आपापल्या गटामध्ये अव्वल वेळ नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्रीत मंडळाचे सरचिटणीस रोहन दामले, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, पुणे शहर विभाग दोनचे पोलिस उपआयुक्त मिलींद मोहीते, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक आलोक मिश्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा ॲथलेटीक्स् संघटनेचे सचिव राजीव कुलकर्णी यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी एसडी कटारिया हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया सोनावणे, सहभागी खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकवर्ग उपस्थित होता.
स्पर्धेत पुणे आणि जिल्ह्यातील नामांकित ७० शाळांमधील सुमारे एकराशे पेक्षा अधिक खेळाडू विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ११ वर्षाखालील गटासाठी १ किलोमीटर, १३ वर्षाखालील गटासाठी २ किलोमीटर आणि १५ वर्षाखालील गटासाठी ३ किलोमीटर अंतराची शर्यत ठेवण्यात आली होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्रीय मंडळाच्या शैक्षणिक संचालिका नेहा दामले, बँक ऑफ महाराष्ट्र टीएमव्ही शाखेचे प्रबंधक मीना मित्तल, सिनेअभिनेता रमेद परदेशी, छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, सिम्बायोसिसचे संचालक डॉ. अमेय येरवडेकर, स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यशवंत निकम, मुख्य वित्त अधिकारी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य श्रीमती वसुंधरा सोबळे यांच्या उपस्थितीत हस्ते पडला. ावेळी विविध सहभागी शाळेतील शिक्षक, प्रशिक्षक आणि पालक उपस्थित होते. विजेत्यांना रोख एक लाख रुपयाची बक्षिसे, पदके, प्रमाणपत्रे आणि स्पोर्ट्स टि-शर्टस् प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पांडे, एस.डी. कटारीया हायस्कूलचे मनोज पवार यांनी सुत्रसंचालन तर, आभार मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया सोनावणे यांनी मानले. स्पर्धेच्या समन्वयकाची जबाबदारी क्रीडाशिक्षक हर्षल निकम व राजाराम कांबळे यांनी पार पाडली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः (क्रमांक, नाव, वेळ, शाळेचे नाव या क्रमानुसार)ः
सदर स्पर्धेचा निकाल प्रथम नऊ क्रमांक खालीलप्रमाणे :
१५ वर्षाखालील मुले (३ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१) प्रतिक देवदास अव्हाळे ११.२७ (जे .एस .पि. एन. स्कुल. पुणे )
२) अर्णव अश्वत पवार ११.३२ (डी. ई. एस. स्कुल पुणे)
३) नबीन भीमसेन सौद १२.२८ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
४) रिषभ प्रसन रेवणकर १२.३१ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
५) श्रेयश तानाजी भालेकर १२.३२ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
६) कार्तिक बापू तांबे १२.३७ ( ज्ञानांकार इंग्लिश स्कुल पुणे)
७) अकिब खालिद सय्यद १२.५८ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
८) हर्षल विजय ब्रह्मे १३.०६ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
९) सोहम संतोष गायकवाड १३.२६ (एस. डी कटारिया हायस्कूल पुणे)
१५ वर्षाखालील मुली (३ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१) अदिती अभिजित भाट १२.३४ ( बी. जे.एस स्कुल पुणे )
२) इरा समीर चिकणे १२.३६ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे)
३) अक्षदा खंडू धुमाळ १२.४४ ( बी. जे.एस स्कुल पुणे )
४) रिद्धी क्रिष्णा गायकवाड १३.२० ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे)
५) अमृता योगेश्वर हंगार्गे १३.४२ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे)
६) अपूर्व सचिन साखरे १४.०० ( बी. जे.एस स्कुल पुणे )
७) अन्विता कैलास बोर्डे १४.०३ ( बाळकृष्ण मंदिर स्कुल पुणे)
८) आर्व नंदकुमार स्वामी १४.३० ( बाळकृष्ण मंदिर स्कुल पुणे)
९) प्राजक्ता विजय शेंडकर १४.५३ ( एन. एस व्ही. स्कुल पुणे
१०) सई सुधीर कारळे १५.१३ ( सेंट जोशेफ स्कुल पुणे)
१३ वर्षाखालील मुले (२ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१)वेदांत प्रशांत जाधव ८.३३ ( डॉन बॉस्को स्कुल पुणे)
२) रोशन संतोष अल्हाट ८.३४ ( डॉन बॉस्को स्कुल पुणे)
३)चिरंजीव महेश परदेशी ८.४० ( एम. एम. स्कुल पुणे)
४) शुभंकर अतुल पांढरे ८.४२ ( एम. एम. स्कुल पुणे)
५) आरुष सुनील दिघे ८.४६ ( परांजपे विद्यामंदिर पुणे )
६)वेदांत योगेश रेणुसे ८.५१ ( मुक्तांगण स्कुल पुणे)
७) शैलेश अनिल राठोड ८.५२ ( कै. गणपतराव शिंदे स्कुल पुणे)
८) ओनेसीमस शामुवेल नाईक ८.५३ ( वाय . एम. सी. स्कुल पुणे)
९) इवान प्रवीण परमानंद ८.५८ ( वाय . एम. सी. स्कुल पुणे)
१३ वर्षाखालील मुली (२ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१)अनन्या उमेश शिंदे ८.३८ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे )
२) मृगया संदीप जरांडे ८.४१ (नालंदा इंग्लिश स्कुल पुणे)
३) साईस्वरा विश्वनाथ रेवणकर ८.४२ ( भारती विद्या स्कुल पुणे)
४)सुरभी संदीप खाडे ८.४३ ( आर्यन वर्डस स्कुल पुणे)
५) आरोही प्रवीण उत्तेकर ८.४५ ( माउंट कार्मिल स्कुल पुणे)
६) आराध्या अंकुश गायकवाड ८.४६ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे )
७) काव्या शरद वरघडे ८.५६ ( बी. जे.एस स्कुल पुणे )
८) शरयू बालाजी उत्तेकर ९.०१ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे )
९) दृष्टी राकेश वैष्णव ९.०४ ( अहिल्यादेवी हायस्कूल पुणे )
११ वर्षाखालील मुले (१ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१) वरद निलेश भोर ४.०४ ( विबग्योर स्कुल पुणे )
२) शौर्य भूषण गरवारे ४.२३ ( एस.पि एम स्कुल पुणे )
३) भावेश विजय खांडेकर ४.२४ ज्ञानगंगा इंग्लिश स्कुल पुणे
४) शौर्य सचिन गायकवाड ४.२६ ( मॉर्डेन स्कुल पुणे )
५) श्रेयश उदयकुमार पन्हाळकर ४.२७ (महाराष्ट्रीय मंडळ स्कुल पुणे
६) युनय हर्षल दराडे ४.२८ ( एस.पि एम स्कुल पुणे )
७) मयूर जयराम सोनारा ४.२९ (ए. आय. एस. स्कुल पुणे )
८) ध्रुव राजेश जगताप ४.३३ ( डॉन बॉस्को स्कुल पुणे)
९) आदित्यकुमार राकेशकुमार साह ४.३९( थिटे प्रायमरी स्कुल पुणे)
१०) रिशी राजेश तिवारी ४.४१ ( अनुश्री स्कुल पुणे )
११ वर्षाखालील मुली (१ कि.मी.): क्र.विजेत्याचे नाव :
१) अलंक्रिता अनिल गुडूर ४.२४ ( आर्यन वर्डस स्कुल पुणे)
२) अंकिता मोहन पोळेकर ४.४८ (महाराष्ट्रीय मंडळ स्कुल पुणे
३) कायरा चेतन तांदळेकर ४.४९ ( त्रीनिती स्कुल पुणे
४) एस. तपस्या सर्वानन ४.५१ (एस.पि एम पब्लिकस्कुलपुणे
५) काश्वी गणेश काळे ४.५३ (एस.पि एम स्कुल पुणे
६) ऋग्वेदा सागर वीरकर ४.५९ (एस. हेलाना स्कुल पुणे
७) अनिश्का संजय शहा ५.०३ (एद्यू कॉन स्कुल पुणे
८) वेदिका उमाकांत कोंडमांगले ५.०४ (न्यू . टाईम्स स्कुल पुणे
९)स्वर संजय गवस ५.०७ थिटे प्रायमरी स्कुल पुणे)
१०) दित्या सचिन कोनापुरे ५.१० (एस. हेलाना स्कुल पुणे
