Tuesday, June 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुरावे आणि साक्षीदार असल्याखेरीज अपघात की हत्या हे निश्चित करणे कायद्याला मान्य नाही

सिया गोयलचे वकील ॲड आशुतोष श्रीवास्तव यांनी पत्रकारांश बोलताना मांडली भूमिका

पुणे प्रतिनिधी

केतन अग्रवाल कथित हत्या प्रकरणी पोलिसांकडे केवळ संशय सोडला तर कोणताही ठोस पुरावा अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही पुरावे आणि साक्षीदार असल्याखेरीज अपघात की हत्या हे निश्चित करणे आणि यासंबंधी कोणाला दोषी ठरवणे कायद्याला मान्य नाही, अशी भूमिका या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील ॲड आशुतोष श्रीवास्तव यांनी पत्रकारांश बोलताना मांडली.

सिया ही केवळ वीस वर्ष वयाची नवतरुणी आहे. तिने पोलीस कोठडीच्या काळात पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. सियाने तिच्याजवळ असलेली सर्व माहिती पोलिसांना दिली आहे आणि यापुढे पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी आहे. त्यामुळे तिच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात येऊ नये, अशी आपली मागणी असणार असल्याचे ॲड श्रीवास्तव यांनी सांगितले.

संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपल्या पसंतीचा वकील नियुक्त करणे आणि त्यांच्यामार्फत आपली बाजू न्यायालयात मांडणे, हा आपल्या आशिलाचा अधिकार असल्याचा दावा ॲड श्रीवास्तव यांनी केला. केतनच्या मृत्यू प्रकरणी नेमके काय घडले हे स्पष्ट झाले पाहिजे आणि संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आली पाहिजे, हेच आपले म्हणणे असल्याचेही त्यांनी सांगितले.

केतनच्या मृत्यूपूर्वी तीन किंवा चार वेळा सियाने केतनला ठार मारण्याचा कट रचण्याचा दावा आपल्याला व्यवहारे वाटत नसल्याचे मत ॲड श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. एखादी तरुणी आपल्या नियोजित वरा बरोबर दोन्ही कुटुंबीयांच्या परवानगीने विविध ठिकाणी जात असेल आणि त्यावेळी तिच्या वागण्यामध्ये कोणतेही ठळक बदल दिसून येत नसतील, त्याचप्रमाणे जर दावा करण्यात आल्याप्रमाणे हे हप्त्याचे प्रयत्न अयशस्वी होऊनही कोणताही संशय उत्पन्न होऊ शकला नाही, ही बाब अशक्य असल्याचे मत ॲड श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

प्राथमिक माहिती अहवालानुसार सिया आणि चेतन चौधरी यांच्या निखळ मैत्रीचे संबंध होते. प्रेमसंबंध नव्हे. सध्याच्या काळात भिन्नलैंगिक व्यक्तींची मैत्री सामान्य मानली जाते. वास्तविक सिया आणि चेतन यांच्यात प्रेमासंबंध असेल तर यापूर्वी ते उघड झाले असते आणि किमान लग्न ठरवण्यापूर्वी त्याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आला असता, असेही ॲड श्रीवास्तव म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading