Wednesday, July 1, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

नसरापूर बलात्कार व हत्येच्या आरोपीला विशेष न्यायालयाने ठोठावली फाशीची शिक्षा


पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर निर्घृण बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे विशेष द्रुतगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोमवारी हा निकाल जाहीर केला.

या प्रकरणात न्यायालयाने आधीच आरोपीला दोषी ठरवले होते आणि शिक्षेचा फैसला राखीव ठेवला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

१ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने बळकावले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीचा हात धरून नेताना स्पष्ट दिसत होता. आरोपीने गुन्हा कबूलही केला होता.

चिमुकलीच्या कुटुंबीयांनी आणि आरोपीच्या कुटुंबीयांनी देखील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. या घटनेनंतर राज्यभरात विविध संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती.

मानवतेच्या विरुद्ध असलेल्या या गुन्ह्याबद्दल न्यायालयाने कठोर भूमिका घेत आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणातील पुरावे आणि गुन्ह्याची क्रूरता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading