Thursday, August 27, 2026
Latest NewsSports

आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियन प्रीतम केंद्रे याचे पुण्यात जोरदार स्वागत

पुणे : जर्मनी येथे गेल्या आठवड्यात झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावून वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या प्रीतम केंद्रेचे पुण्यात जोरदार  स्वागत करण्यात आले. गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनच्या गन फॉर ग्लोरी शुटींग अकॅडमीच्या औंध येथील केंद्रात सदर स्वागत सोहळा  संपन्न झाला.

यावेळी  यावेळी नॅशनल रायफल असोसीएशन ऑफ इंडियाचे महासचिव व  गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनचे संचालक पवन सिंह यांनी प्रीतमचे स्वागत व सत्कार केला. प्रीतमचे प्रशिक्षक किरण खंडारे व शुभम पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्यास गन फॉर ग्लोरी शुटींग अकॅडमीचे व्यवस्थापक परमेश्वर तुपसमिंद्रे, प्रोजेक्ट लीपच्या व्यवस्थापिका राधिका देशमुख, परदेशी प्रशिक्षक उवे क्नाप व प्रीतमची आई प्रियदर्शिनी व वडील तुकाराम केंद्रे उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने जर्मनीतील सुहल येथे आयोजित करण्यात आलेल्या  ज्युनिअर वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याच्या १६ वर्षीय नेमबाज प्रीतम केंद्रे याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.  प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून प्रीतमने भारतासह पुण्याचेही नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची प्रीतमची फक्त दुसरीच वेळ होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा फारसा अनुभव पाठीशी नसून देखील संयमाने खेळत प्रीतमने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

दहा (१०) मीटर एअर रायफल प्रकारात प्रितमने पात्रता फेरीत ६२८.२ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.अंतिम फेरीत त्याने २५१.३  गुणांची नोंद करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.या जागतिक स्पर्धेत ६६ देशांतील सुमारे ८०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध उपक्रमाचा भाग असलेला प्रीतम गेल्या चार वर्षांपासून पुण्यातील म्हाळुंगे – बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीमध्ये कार्यरत असलेल्या गन फॉर ग्लोरी शूटिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.  प्रीतमचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तो आळंदी येथून रोज पहाटे प्रवास करून सकाळी ७ वाजल्यापासून येथे सरावासाठी पोहोचतो. शाळा, शूटिंग प्रशिक्षण आणि फिजिकल ट्रेनिंग यांचा समतोल साधत तो रात्री उशिरा घरी परततो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading