Wednesday, August 26, 2026
Latest NewsSports

क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे :  पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित ‘पीसीए बिगबॅश करंडक‌’ आंतरक्लब १४ वर्षाखालील गटाच्या टी-२० रात्रं-दिवस क्रिकेट स्पर्धेत अव्देत अमोंडकर याने केलेल्या ८५ धावांच्या मदतीने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने राजपुत क्रिकेट ॲकॅडमीचा ५३ धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्म्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्यांदा फलंदाजी करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीने (सीएनए) २० षटकात ७ गडी गमावून १६४ धावांचे लक्ष्य उभे केले. अव्देत अमोंडकर ५१ चेंडूत १२ चौकार आणि एक षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. अनिश्वर मिश्रा याने ३६ धावांचे योगदान दिले. सहाव्या गड्यासाठी अव्देत आणि अनिश्वर यांनी ५७ चेंडूत ९४ धावांची भागिदारी केली आणि संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजपुत क्रिकेट ॲकॅडमीचा डाव १९.५ षटकात १११ धावांवर संपुष्टात आला. कृष्णा भुरटूकणे (२३ धावा) आणि सिद्धांत सिंग (२२ धावा) यांनी धाव करून प्रतिकार केला. अर्णव रणदिवे आणि कबिर जोशी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून सीएनए संघाचे विजेतेपद साकार केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक सागर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहभागी संघांचे प्रशिक्षक, पालक वर्ग उपस्थित होता. विजेत्या क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी आणि उपविजेत्या राजपुत क्रिकेट ॲकॅडमी संघांना करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकालः
क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १६४ धावा (अव्देत अमोंडकर ८५ (५१, १२ चौकार, १ षटकार), अनिश्वर मिश्रा ३६, कृष्णा भुरटूकणे २-३०); (भागिदारीः सहाव्या गड्यासाठी अव्देत आणि अनिश्वर यांच्यात ९४ (५७) वि.वि. राजपुत क्रिकेट ॲकॅडमीः १९.५ षटकात १० गडी बाद १११ धावा (कृष्णा भुरटूकणे २३, सिद्धांत सिंग २२, अर्णव रणदिवे २-१२, कबिर जोशी २-२३); सामनावीरः अव्देत अमोंडकर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading