Saturday, April 25, 2026
Latest NewsPUNESports

उपमहापौर करंडक ट्रॅकनाइट्स राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात

पुणे : प्रतीक काणेरे, यमुना लडकत यांनी ॲथलेटिक्स स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना यांच्या सहकार्याने आयोजित उपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत खुल्या गटातील ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल क्रमांक पटकावला.
सणस मैदानावर शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. प्रकाशझोतात ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, कोल्हापूर, संभाजीनगर या ठिकाणाहून ७३९ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे सहसचिव विजय बेंगळे, चंद्रकांत पाटील आणि स्पर्धा संयोजन सचिव चिराग पटेल आदी उपस्थित होते
या स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रतीक काणेरेने १ मिनिट ५९.४१ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. त्याने निखिल सहानी (१ मि. ५९.८० से.) आणि मयूर थोरवे (२ मि. ००.१५ से.) यांना मागे टाकले. निखिल दुसरा, तर मयूर तिसरा आला. महिला गटात यमुना लडकतने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत २ मिनिटे १६.५४ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला. वेदश्री लोणारीने २ मिनिटे २०.६० सेकंद वेळ नोंदवून दुसरा, तर जिया शाह हिने ३ मिनिटे ४३.९३ सेकंद वेळ नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला.

निकाल :
८०० मीटर – पुरुष खुला गट – प्रतीक काणेरे (१ मि. ५९.४१ से.), निखिल सहानी (१ मि. ५९.८० से.), मयूर थोरवे (२ मि. ००.१५ से.)
८०० मीटर – महिला खुला गट – यमुना लडकत (२ मि. १६.५४ से.), वेदश्री लोणारी (२ मि. २०.६० से.), जिया शाह (३ मि. ४३.१३ से.).
८०० मीटर – १८ वर्षांखालील मुले – रणवीर फारकते (२ मि. ३.३७ से.), सोहम काटे (२ मि. ५.५९ से.), अवनीश मुळे (२ मि. ७.७५ से.)
८०० मीटर – १८ वर्षांखालील मुली – दक्षा नहार (२ मि. ४३.६० से.), सृष्टी गायकवाड (२ मि. ४७.१५ से.), वैष्णवी लांडे (२ मि. ५४.२३ से.)

गोळा फेक – १६ वर्षांखालील मुली – जयानी पाटील (११.८१ मी.), अमृता जाधव (९.६८ मी.), चैतन्य भोसले (९.६४ मी.)

६०० मीटर धावणे – १६ वर्षांखालील मुले – क्षितिज शिंदे (१ मि. २८.८८ से.), आर्यन बच्छाव (१ मि. ३०.२७ से.), हितांश मोमया (१ मि. ३३.८९ से.).

६०० मीटर धावणे – १६ वर्षांखालील मुली – सोमती कोडग (१ मि. ४२.२३ से.), गौरी कुलाल (१ मि. ४७.८५ से.), निष्ठा त्रिपाठी (१ मि.४९.४७ से.).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading