भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विकास प्रतिष्ठान, बावधन व सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भीम फेस्टिवल २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडला. १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यात महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक महापौर मंजुषा नागपुरे यांनी उपस्थिती लावून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा सत्कार बावधन गावचे माजी सरपंच वैशाली कांबळे, उमेश कांबळे, सुषमा कांबळे तसेच युवा उद्योजक निखिल बांदल यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच अशोक डोंगरे, पश्चिम महाराष्ट्र मंडप असोसिएशनचे अध्यक्ष विजय दगडे पाटील, युवा नेते राहुल दगडे पाटील यांच्यासह बावधन परिसरातील हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व उपस्थित मान्यवरांचे विकास प्रतिष्ठानच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या भव्य सोहळ्याचे आयोजन यशराज उमेश कांबळे यांनी केले होते.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
