Saturday, October 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचा पुण्यात भव्य सोहळा; लोकप्रतिनिधींनी वाहिली आदरांजली

 

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन सकाळी १० वा. करण्यात आले होते. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला विनम्र अभिवादन केले.

मान्यवरांची मांदियाळी:
मध्यवर्ती समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गणेश बिडकर , नगरसेवक निलेश आल्हाट , जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव ,रिपाई शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील , मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे यांच्यासह अनेक नगरसेवकांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली.

प्रशासकीय आणि सामाजिक सहभाग:

यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार आणि समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या मानवंदनेने झाली, तर बौद्ध भिक्षूंच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना आणि भीमस्तुतीचे गायन करण्यात आले. शेवटी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी यांचे आयोजन केले होते तर या सोहळ्यासाठी राहुल नागटिळक, विठ्ठल गायकवाड आणि समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading