Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाला धोका राहुल गांधींचा नव्हे तर मोदींचा …! – वरीष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे   – राष्ट्रपतींच्या भाषणावर संसदेत उत्तरा पासुन पळ काढणारे पंतप्रधान मोदी देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान असुन, सत्तापक्ष स्वतःचे उत्तरदायित्व लपवण्यासाठी ‘विरोधी पक्ष नेत्या’वर तथ्यहीन आरोप करत संसदीय मंत्री किरण रिजूजू बेजबाबदार विधाने करत देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की आजतागायत नोटबंदी, पुलवामा, पहेलगाम अतिरेकी हल्ले, मणीपुर अत्याचार, ॲापरेशन सिंदूर, परराष्ट्रीय धोरण, चिन घुसखोरी, अमेरिकन ट्रेड डील सारख्या अनेक गंभीर व महत्वाच्या विषयांवर संसदेत सारासार चर्चा करण्याचे धारीष्ट्य सत्ताधारी भाजप – एनडीए आघाडी सरकारने दाखवलेले नाही ही वास्तवता आहे.
१२ वर्षात एकाही पत्रकार परीषदेस सामोरे न गेलेले सत्ताधारी भाजपा’चे नेतृत्व केवळ विरोधी पक्ष नेत्यांवर निरर्थक गरळ ओकण्यातच धन्यता मानत आहे.

देशातील जनतेने १० वर्षांचा मोदी-काळ’ अनुभवातुनच, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या १००% जागा वाढल्याचे व सत्ताधारी भाजपच्या ३३ % जागा कमी झाल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजूजू सोईस्कर विसरतात काय (?) असा उपरोधिक सवाल ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा यांनी केला.
संसदेत कथित देशहिताच्या घेतलेल्या स्व-निर्णयांचे समर्थन देखील, चर्चेद्वारे करू न शकणाऱ्या भाषणजीवी सत्तापक्षाचाच् देशाला अधिक धोका आहे, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा नव्हे, असे खडे बोल ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांच्या कथित आरोपांवर प्रत्युत्तर दाखल सुनावलें ..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading