होय… केली मी भाजपला मदत: नाथाभाऊंचे गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर
जळगाव : मुक्ताईनगरमध्ये खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्ये झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत भाजपला मदत केली, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील. यांनी त्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. नाथाभाऊंनी, होय, केली मी भाजपाला मदत, असे सांगत त्यांना प्रत्युत्तर दिले.
वरणगाव नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी पराभूत झाले. त्यानंतर त्यांना शिवसेनेकडून विकृत सदस्य पद देण्यात आले. त्यांच्या पठोपाठ शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी नाथाभाऊंना चिमटा घेण्याची संधी सोडली नाही
गुलाबराव पाटील इतक वर्ष मंत्री असून देखील त्यांना त्यांच्या गावातही त्यांच्या पक्षाची सत्ता आणता आली नाही, असा टोलाही नाथाभाऊंनी गुलाबराव पाटील यांना लगावला. खरं बोलायला काय हरकत आहे? मुक्ताईनगर परिषदेत मी खरंच भाजपाला मदत केली, असेही नाथाभाऊ म्हणाले.
