Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुसल्या जाणाऱ्या शाईप्रकरणी चौकशीची भूषण गगराणी यांचे आदेश

 

मुंबई प्रतिनिधी

मतदानानंतर मतदारांच्या बोटावर मार्कर द्वारे लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

मतदारांच्या बोटांना मतदानानंतर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी अनेक मतदार आणि उमेदवारांनी केले आहेत. त्याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहेत. अनेक स्थानिक नेत्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत टीका केली आहे. त्यानंतर गगराणी यांनी हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणूक प्रक्रिये बाबत अशा प्रकारे शंका उपस्थित होणे योग्य नाही. सध्या वापरल्या जाणाऱ्या मार्करची शाई पुसली जात असेल तर दुसऱ्या शाईचा वापर करा. वेळ पडली तर ऑइल पेंटचाही वापर करा, असे फडणवीस म्हणाले. त्याचवेळी योग्य तक्रारी करण्यास हरकत नाही. मात्र, संवैधानिक संस्थांच्या हेतू बद्दल शंका उपस्थित करणे योग्य नाही, असेही त्यांनी विरोधकांना सुनावले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading