उस्ताद हमीद खान यांच्या स्मरणार्थ १८ जानेवारी रोजी रिवायत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सतारवादनाला एका उंचीवर नेऊन ठेवत त्यासोबत इतर वाद्यांचे वादन व गायन यांचा मेळ घालीत कार्यक्रम करण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रसिद्ध सतार वादक उस्ताद हमीद खान यांच्या स्मरणार्थ पुण्यातील सतारवादक रईस खान यांच्या सुहाना बसंत या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘रिवायत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवार दि. १८ जानेवारी रोजी घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनातील सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून सदर कार्यक्रम संपन्न होणार असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन संपन्न होईल अशी माहिती रईस खान यांनी कळविली आहे.
