Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणेकरांच्या प्रश्नावर भाजप विरोधात भुमिका घेणारेअजितदादा, ३॥ वर्षात पुणेकरां साठी संघर्ष करताना का दिसले नाहीत..? काँग्रेस’चा सवाल

लोकमान्य नगर विकसन-स्थगिती ऊठल्या प्रकरणी लागलेल्या (खोट्या श्रेयजीवी) बॅनर्स’वर आचारसंहिता भंगाची कारवाईची, आयोगाकडे मागणी..
पुणे  :  पुण्याच्या विकासासाठी सत्तेतील भाजप विरोधात दंड थोपटणारे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार पुणेकरांच्या प्रश्नांवर’ सत्तेत राहून ही कुठल्याही प्रकारे संघर्ष करतां का दिसले नाहीत (?) असा तिखट सवाल काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘प्रभाग क्र २७ मधील’ काँग्रेस – शिवसेना आघाडी उमेदवार सौ पायल काळे, नंदकुमार वीर, गायत्री गरूड व अनंत धरत यांचे प्रचार समारोप प्रसंगी विचारला.


ते पुढे म्हणाले की, लोकमान्य नगर’च्या विकासाची स्वप्ने दाखवणारे राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचे नेते अजितदादा यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अन्यायकारक दिलेल्या स्थगिती’वर मंत्रिमंडळात वा बाहेर देखील शब्द ही का उच्चारला नाही ..? असा सवाल ही काँग्रेस ने विचारला.
अखेरकार,
ऊच्च न्यायालयाने लोकमान्य नगर विकासावरील ‘राज्य सरकारची स्थगिती’ उठवतांना सरकारच्या अनैतिक हस्तक्षेपावर ताशेरे ओढले व स्थगिती ऊठवुन विकासास मान्यता दिली याचे सर्वस्वी श्रेय हे संविधान व न्यायालयास जाते.
मात्र स्थगिती ऊठल्या बद्दल लोकमान्य नगर परीसरात मुख्यमंत्री फडणवीासांचे लागलेले ‘अभिनंदनाचे बॅनर्स’ भाजप नेत्यांची हास्यास्पद श्रेयजीवी वृत्ती प्रदर्शित करते. वास्तविक आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोगाने तातडीने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading