Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून…

सोलापूर  :- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब सरवदे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. याठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरून सायंकाळी जोशी गल्लीत दोन गटात वाद झाला, त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे याला तातडीने मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणात चार संशयतांना अटक केल्याची सुद्धा माहिती मिळत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांचा मयत दादासाहेब सरवदे हा नातेवाईक असल्याचे समजते. या प्रकरणात इंगळे हे आक्रमक असून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आणि नेत्यावर आरोप केले आहेत संबंधित आमदारांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आह

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading