Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स : अधिक निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी संरक्षणाची नवी व्याख्या

मुंबई : परंपरेने जीवनविमा हा पॉलिसीधारकाच्या निधनानंतर कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण देणारा उपाय म्हणून पाहिला जात होता. मात्र बदलती जीवनशैली, वाढते आरोग्यविषयक धोके आणि कामकाजाच्या पद्धतींतील बदल यामुळे संरक्षणाची संकल्पनाही बदलत आहे. आजचा भर प्रतिक्रियेवर आधारित संरक्षणापेक्षा दीर्घ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आयुष्याला पाठबळ देणाऱ्या दृष्टिकोनाकडे वळताना दिसतो.

आधुनिक संरक्षण आता केवळ मृत्यू लाभांपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते दीर्घायुष्य, आरोग्य आणि एकूणच कल्याण सुरक्षित ठेवण्यावर केंद्रित आहे. भारताच्या वेगवान कार्यसंस्कृतीत हा बदल विशेष महत्त्वाचा ठरतो, कारण येथे आर्थिक सुरक्षिततेला बदलत्या जीवन टप्प्यांशी, आरोग्य आव्हानांशी आणि जागतिक पातळीवरील हालचालींशी सातत्याने जुळवून घ्यावे लागते.

वनसाइजफिट्सऑलपेक्षा सानुकूलतेवर भर

संरक्षणाच्या गरजा वय, उत्पन्न पातळी, लिंग आणि भौगोलिक परिस्थितीनुसार मोठ्या प्रमाणात बदलतात. उदाहरणार्थ, तरुण व्यावसायिकांच्या गरजा, स्थिरावलेल्या व्यावसायिकांपेक्षा, जीवनातील विविध टप्पे सांभाळणाऱ्या महिलांपेक्षा किंवा भारतामधील कुटुंबीयांना आर्थिक आधार देणाऱ्या NRI व्यक्तींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे पारंपरिक, एकसारख्या टर्म प्लॅन्स आजच्या काळात अपुरे ठरत आहेत.

ही पोकळी भरून काढण्यासाठी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स प्रत्येक जीवन टप्प्यावर व्यक्तीच्या गरजांशी जुळणारे सानुकूल टर्म इन्शुरन्स सोल्युशन्स सादर करत आहे. संरक्षण हे लवचिक, सुसंगत आणि बदलत्या परिस्थितींना प्रतिसाद देणारे असावे, या तत्त्वावर आधारित हा दृष्टिकोन आधुनिक विमा गरजांना अधिक प्रभावीपणे उत्तर देतो.

मृत्यू लाभांपलीकडे टर्म इन्शुरन्सची नवी व्याख्या

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने टर्म इन्शुरन्सकडे केवळ जीवन संरक्षण म्हणून न पाहता, समग्र संरक्षण उपाय म्हणून नव्याने मांडणी केली आहे. कंपनीच्या टर्म प्लॅन्समध्ये आता जीवनविम्यासोबतच गंभीर आजार संरक्षण, आरोग्य सहाय्य आणि वेलनेस सेवा यांचा समावेश आहे. यामागील उद्दिष्ट केवळ एखाद्या प्रतिकूल घटनेनंतर आर्थिक सुरक्षितता देणे एवढेच नसून, प्रतिबंधात्मक काळजी आणि लवकर हस्तक्षेप यांच्या माध्यमातून पॉलिसीधारकांना सक्रियपणे साथ देणे हे आहे. त्यामुळे विमा हा फक्त संकटानंतरचा आधार न राहता, निरोगी आणि सुरक्षित आयुष्याचा भाग बनत आहे.

सुजीत कोठारे, चीफ – प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अँड बिझनेस मिड ऑफिस, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स म्हणाले, “आज संरक्षण ही संकल्पना केवळ मृत्यूनंतर काय होईल यापुरती मर्यादित राहिलेली नाही—ती अधिक चांगले, दीर्घ आणि आत्मविश्वासाने जगण्याबद्दल आहे. आम्ही टर्म इन्शुरन्सची नव्याने मांडणी करत ती जिवंत, सक्रिय उपाययोजना म्हणून विकसित केली आहे, जी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांना साथ देते. ‘हेल्थ बडी’च्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि वेलनेस सुविधांपर्यंत सहज प्रवेश देत, आम्ही पॉलिसीधारकांच्या दैनंदिन आरोग्य गरजांना प्रत्यक्ष पाठबळ देत आहोत.”

विविध ग्राहक गटांसाठी सानुकूल टर्म इन्शुरन्स सोल्युशन्स

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स विविध ग्राहक गटांच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या टर्म प्लॅन्सची सविस्तर श्रेणी सादर करते:

  • टाटा एआयए शुभ फॅमिली प्रोटेक्ट – वाढत्या कुटुंबांसाठी डिझाइन केलेली योजना. हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या उत्पन्न-प्रतिस्थापन लाभांद्वारे आर्थिक आधार, टर्मिनल आजार संरक्षण, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, डायग्नोस्टिक्स आणि तज्ज्ञ सल्लामसलत यांचा समावेश.
  • टाट एआयए संपूर्ण रक्षा प्रॉमिस – तरुण व्यावसायिकांसाठी उपयुक्त. स्पर्धात्मक प्रीमियममध्ये उच्च विमा संरक्षण, वय 100 वर्षांपर्यंतचे होल-लाईफ कव्हर, लवचिक प्रीमियम भरणा पर्याय, तसेच उद्योगात प्रथमच गंभीर आजार आणि हॉस्पी-कॅश लाभ दीर्घकालीन प्रीमियम दर हमीसह.
  • टाटा एआयए महा रक्षा सुप्रीम सिलेक्ट – स्थिरावलेले व्यावसायिक आणि HNI (हाय-नेट-वर्थ व्यक्ती) यांच्यासाठी. उच्च मूल्याचे संरक्षण, जीवन टप्प्यानुसार कव्हर वाढवण्याची सुविधा, परिपक्वतेनंतर नूतनीकरण, निवृत्तीकेंद्रित पेआउट्स, आणि व्यापक रायडर पर्याय.
  • टाटा एआयए शुभ शक्ती – महिलांसाठी विशेष तयार केलेली संरक्षण योजना. जीवनविमा आणि वेलनेस लाभांचे संयोजन, महिलांसाठी खास आरोग्य गरजांचे कव्हर, प्रीमियम माफी, गर्भधारणेदरम्यान लवचिक प्रीमियम ब्रेक्स, तसेच सिंगल मदर्ससाठी विशेष लाभ.
  • टाटा एआयए शुभ रक्षक – एनआरआय पुरुष ग्राहकांसाठी डिझाइन केलेली योजना. रुपयामध्ये नामांकित जीवनविमा, भारतातील कुटुंबीयांसाठी वेलनेस लाभ, डिजिटल ऑनबोर्डिंग, जागतिक स्तरावर सेवा, आणि चलन चढउतारांपासून संरक्षण.

लवकर संरक्षणाचे महत्त्व

आजच्या अनिश्चित वातावरणात टर्म इन्शुरन्स लवकर घेणे अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहे. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे टर्म प्लॅन्स पॉलिसीधारकांसोबत विकसित होत जातील अशा पद्धतीने तयार करण्यात आले असून, जबाबदाऱ्या आणि जोखमी काळानुसार बदलत असताना त्यांना अनुरूप अशी समग्र सुरक्षा देतात.

आज संरक्षण घ्या. आत्मविश्वासाने जगा. उद्याचा विचार करा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading