गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या दोन सुनांना अजित पवार गटाकडून उमेदवारी
पुणे प्रतिनिधी
आपल्याच नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली गजाआड असलेला गुंड बंधू आंदेकर आणि त्याच्या दोन सुनांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
बंडू आंदेकर यांच्या मुलीचा मुलगा आयुष कुमकर यांच्या खुनाचा आरोप या तिघांवरही आहे. संपूर्ण आंदेकर टोळीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असून टोळीतील आणि आंदेकर कुटुंबातील बहुतेक जण जेरबंद आहेत. बंडू आंदेकर आणि त्याच्या सुना तुरुंगातूनच महापालिकेची निवडणूक लढवत आहेत.
मोक्का विशेष न्यायालयाच्या सशर्त परवानगीने या तिघांनीही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्तात आपले उमेदवारी अर्ज यापूर्वीच दाखल केले आहेत. आज अजित पवार गटाकडून या तिघांनाही एबी फॉर्म देण्यात आला.
कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांना देखील अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
