Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नाशिक महापालिकेसाठी तिरंगी लढती

नाशिक प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकटे पाडत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटांची युती व महाविकास आघाडी अशी तिरंगी होणार आहे.

महापालिकेची एकूण सदस्यसंख्या 122 आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 92 ते 95 आणि अजितदादांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागांवर निवडणूक लढवणार आहे. रिपब्लिकन सेनेला 2 जागा सोडण्यात येणार आहे.

मागील काही काळापासून, विशेषतः विधानसभा निवडणुकीपासून आत्तापर्यंत विरोधी पक्षातील अनेक दिग्गजांनी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीमध्ये, विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर प्रवेश केले. मात्र, या आयातीमुळे भाजपचे स्थानिक पातळीवरील निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. खुद्द आमदार देवयानी फरांदे या देखील नाराज असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे मित्रपक्षांनी सोडलेली साथ आणि पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी असे दुहेरी आव्हान भाजपसमोर उभे आहे. या दोन्ही प्रकारांचा मतदारांवर नेमका काय परिणाम झाला हे निवडणूक निकालानंतरच उघड होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading