Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कुख्यात गुंडाच्या पत्नीला अजितदादांच्या पक्षाकडून उमेदवारी

 

पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्या प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढवणार असून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म ह देण्यात आला आहे

गजा मारणे हा सध्या कारागृहात आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारणे टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. याबद्दल गजा मारणे याच्यावर गुन्हा दाखल आहे.

यापूर्वी देखील गजा मारणे याच्या घरी भेट दिल्याबद्दल अजित पवार हे वादात सापडले होते. जयश्री मारणे या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading