Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आकाराला येण्यापूर्वीच तुटली काका पुतण्यांची युती

 

जागावाटप आणि चिन्हावरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद

पुणे प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत युती करण्यासंबंधी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह आणि जागावाटप या मुद्द्यांवर मतभेद होऊन आकाराला येण्यापूर्वीच दोन राष्ट्रवादींची युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता पुन्हा महाविकास आघाडीची जुळणी करण्याच्या प्रयत्नात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते अंकुश काकडे, विशाल तांबे आणि आमदार बापू पठारे यांनी युती संदर्भात अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यात रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. युती झाल्यास दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा अजित पवार यांचा आग्रह होता. मात्र, शरदचंद्र पवार पक्षाने तो मान्य केला नाही. त्याचप्रमाणे शरद पवार गटाची चाळीस टक्के जागांची मागणी अजित पवार यांनी अमान्य केली. या मतभेदांमुळेच काका पुतण्यांची युती होण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.

अजित पवार यांच्याबरोबर ची बैठक निषफळ ठरल्यानंतर आता शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नाला लागली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक नेते वसंत मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे यांच्यासह शरदचंद्र पवार पक्षाचे आणि काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी यांची रात्री उशिरा गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading