सेवा – कर्तव्य – त्यागाचे आदरणीय सोनिया गांधी मूर्तिमंत ऊदाहरण…वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : सेवा – कर्तव्य – त्याग या बाबी काँग्रेसजनांसाठी आचरणाची बाब असून, काँग्रेस’ने सदैव सेवेचे राजकारण केले, मात्र आजचा सत्ताधारी पक्ष केवळ सत्तेचे अर्थात सत्तेवर टिकून राहण्यासाठीचे ‘निवडणूका – भिमुख राजकारण’ करीत असून, ‘पंतप्रधान-कार्यालया’चे नाव ‘सेवा-तीर्थ’; मात्र पीएम रिलीफ फंडा’ची पारदर्शकता नाही.. तर ‘राज पथा’चे नाव ‘कर्तव्य पथ’ मात्र संविधानीक लोकशाही प्रती कर्तव्यांना तिलांजली, तर ‘राज भवन’चे नाव ‘लोक भवन’ मात्र राज्यपाल महोदय सत्तापक्षाचे हस्तक म्हणून वागण्यातच् धन्यता मानत असल्याने… भाजप’च्या लेखी ‘सेवा – कर्तव्य’ शब्द प्रयोग केवळ आभासी असुन, मुळ हेतू व तत्वांना तिलांजली देणारे आहेत असे वक्तव्य प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
सेवा – कर्तव्य- त्याग सप्ताहातील, स्वाधार संस्थेतील मुला मुलींना वस्तू व खाऊ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस वरीष्ठ उपाध्यक्ष व सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी अध्यक्षस्थानी होते. सुत्र संचालन भोला शेठ वांजळे यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक गोरख पळसकर यांनी केले.
या प्रसंगी स्वाधार संस्थेच्या संचालिका स्वाधार संस्थेच्या संचालिका सुवर्णाताई पोटफोडे व महिला सदस्य यांचीही उपस्थिती लाभली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे सरचिटणीस सुरेश कांबळे कसबा ब्लॉक मा. अध्यक्ष बंडू शेडगे, प्रवीण करपे, महेश हराळे, मनोज पाटील, मंगेश थोरवे, धनंजय भिलारे, गणेश शिंदे इ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
