Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

दि डेटा टेक लॅब्स प्रकारांतील तक्रारदाराचा गैरसमज दूर; प्रकरण बंद करण्याची विनंती


पुणे (प्रतिनिधी): दि डेटा टेक लॅब्स इनकॉर्पोरेशन (The DataTech Labs / Dnyanasha Technology Solutions Pvt. Ltd.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित ज्ञानेश्वर आंद्रे यांच्याविरुद्ध करण्यात आलेले फसवणुकीचे, धमकीचे आणि बदनामीकारक आरोप पूर्णपणे तथ्यहीन  आणि गैरसमजातून झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारदाराने स्वतः पूरक जबाब देऊन सर्व आरोप मागे घेतले असून ते आरोप नैराश्य, आर्थिक ताण आणि भ्रम निर्माण झाल्यामुळे केल्याचे नमूद केले आहे. तक्रारदाराने पोलिसांना लेखी स्वरूपात विनंती करून हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली आहे.

डॉ. अमित आंद्रे यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी बावधन पोलिस ठाण्यात अधिकृत निवेदनासोबत सर्व संबंधित कागदपत्रे सादर केली. कंपनीची भारत, अमेरिका, ब्रिटन, यूएई आणि मलेशिया येथील नोंदणी प्रमाणपत्रे, उमेदवारांसोबत झालेल्या सर्व ईमेल नोंदी, प्रशिक्षण शुल्काशी संबंधित बँक रेकॉर्ड, व्यवहारांची माहिती, तसेच याच्याशी संबंधित आर्थिक पुरावे पोलिसांना उपलब्ध करून दिले. या सर्व दस्तऐवजांचा तपास केल्यानंतर आरोपांना कोणताही कायदेशीर किंवा तथ्यात्मक आधार नसल्याचे निष्पन्न झाले.

तक्रारदाराने केलेला आर्थिक फसवणुकीचा आरोपही निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी बहुराष्ट्रीय असल्याचा केलेला खोटा दावा, कोणतेही कारण न देता सेवा समाप्त केल्याचा आरोप आणि उमेदवारांना धमकी दिल्याचे म्हणणे हे सर्व निष्पन्न झालेल्या पुराव्यांशी विसंगत असल्याचे आढळले. डॉ. आंद्रे यांनी कोणत्याही तक्रारदाराशी प्रत्यक्ष भेट घेतलेली नसून, सर्व संवाद अधिकृत ईमेलच्या माध्यमातूनच झाल्याचेही सिद्ध झाले.

तपासादरम्यान तक्रारदाराने स्वतःच आपले आरोप मागे घेतले असून गैरसमज झाल्याचे मान्य केले आहे. डॉ. आंद्रेंनी आपल्या लेखी निवेदनात कंपनी नेहमीच पारदर्शक, कायदेशीर आणि नैतिक पद्धतीने काम करत असल्याचे नमूद केले आहे. सर्व पुरावे, दस्तऐवज आणि तक्रारदाराची कबुली यांची एकत्रित छाननी केल्यानंतर हे प्रकरण पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांकडे या तक्रारीत पुढील कोणतीही कार्यवाही शिल्लक नसल्याचे समजते.

परिणामी, तक्रारदाराने आणि डॉ. आंद्रेंनीही हे प्रकरण बंद करण्याची औपचारिक विनंती केल्याने पुढील काही दिवसांत तक्रार निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही व्यक्तींनी द डेटा टेक कंपनीच्या नावाने बनावट ऑफर लेटर तयार करून लोकांकडून लाखो रुपये घेत सदर रक्कम द डेटा टेक लॅब्स कंपनीस द्यायचे आहेत असे सांगून फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली. यासंदर्भातील महत्वाचे पुरावे तसेच रेकॉर्डिंग्स पोलिसांकडे जमा केल्याचे आंद्रे यांनी सांगितले. अशा कृतीमुळे कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले.

द डेटा टेक लॅब्स कडून सर्व अधिकृत ऑफर लेटर आणि पत्रव्यवहार केवळ कंपनीच्या अधिकृत ईमेल पत्त्यांवरूनच जारी केले जातात. नागरिकांनी कोणत्याही शंकास्पद ईमेल किंवा संदेशाबाबत सावधान राहावे आणि आवश्यक असल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच मार्केटमध्ये योग्य आणि सक्षम व्यक्तिस भरपूर नोकरी आहेत त्यामुळे नोकरीसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

द डेटा टेक लॅब्स ही एक नामांकितकंपनी असून AI & Agentic AI मधे रिसर्च एंड पेटेंट्स केले आहेत. डॉ अमित ज्ञानेश्वर आंद्रे हे डबल डॉक्टरेट व आयआयएम अलुमिनी आहेत. लीडिंग बँक, टेलिकॉम, ऑटोमोबाइल व हेल्थकेअर मधे जागतिक स्तरावर काम व अवॉर्ड पटकावले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading