Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

झी5 तर्फे आपल्या – बे दुणे तीन या मराठी ओरिजिनल मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित, 05 डिसेंबर 2025 रोजी होणार प्रीमियर

मराठी झी5, मराठी मनोरंजनासाठी अतिशय उत्तम ठिकाण असून दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रीमियर होणाऱ्या आगामी ओरिजिनल मालिका बे दुणे तीन चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. आधुनिक नातेसंबंधांची आनंददायी अनागोंदी आणि मनाला भिडणारे बारकावे यांचे ज्वलंत रूप या आयुष्याचे खरे स्वरूप दाखविणाऱ्या विनोदी नाटकात पहायला मिळणार आहे. बे दुणे तीन मध्ये दीक्षा केतकर, विराजस कुलकर्णी आणि शुभांकर एकबोटे सोबतच क्षितिश दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि शिवाणी रांगोळे भूमिका साकारत असून हा अभय आणि नेहा या एका अशा तरुण जोडप्याचा प्रवास दाखवितो ज्यांना एक नव्हे, तर तीन बाळ होणार आहेत, असे कळल्यावर त्यांचे आयुष्य पूर्णपणे पालटते.

या मालिकेचे दिग्दर्शन अथर्व सौंदणकर व हिमांशू पिले यांनी केले असून वृषांक प्रॉडक्शन्स यांनी निर्मिती केली आहे. जिव्हाळा, विनोद आणि वास्तववाद एकत्र करणारी एक ताजी, संबंधित कथा या मालिकेतून दिसून येते. बे दुणे तीन मध्ये प्रभावशाली अभिनय आणि मनाला भिडणारी कथा आहे आणि जोडप्यांशी व कुटुंबांशी खोलवर जुळण्याची खात्री देते.

सुरुवातीला आश्चर्य आणि अविश्वास दिसतो, पण लगेचच गोंधळ, गैरसमज, आणि नव्याने प्रेम अशा भावनांचा सलग प्रवाह प्रारंभ होतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य अशा तीन एकमेकांत गुंफलेल्या काळांमध्ये या मालिकेचे कथन केले जात आहे आणि वैवाहिक आयुष्यातील बदलत्या परिस्थिती आणि यात जवळ येऊन ठेपलेल्या पालकत्वाचे चित्रण करण्यासाठी फारच कलात्मकरीत्या विनोद, भावना आणि सत्यता एकत्र गुंफल्या गेल्या आहेत. बे दुणे तीन संघर्ष, संबंध आणि स्वतःबाबतच्या जाणीवेतील क्षणांद्वारे आयुष्याचे जोडीदार आणि पालक म्हणून एकत्र पुढे जाण्याच्या गोड-तिखट प्रवासावर सुंदरपणे प्रकाश टाकते.

हेमा व्ही.आर., बिझनेस हेड, मराठी झी5, म्हणाल्या, “मराठी झी5 येथे आम्हाला अशा कथा तयार करण्यात गर्व आहे ज्या महाराष्ट्रीयन घरांतील मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी दर्शवतात आणि लोकांना हसायला लावतात, विचार करायला लावतात आणि त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातात. बे दुणे तीन मध्ये त्या दृष्टीला विस्तारून सांगितले गेले आहे. खऱ्या आयुष्यातील नातेसंबंधांमध्ये आनंद आणि अनागोंदी एकत्र असतात, आणि सर्वात अनपेक्षित परिस्थितींमध्येही प्रेम अधिक खोलवर वाढत असते आणि असेच नातेसंबंधातून या कथेतून दाखविले गेले आहे. अभय आणि नेहाच्या प्रवासाशी आमचे प्रेक्षक त्वरित जोडले जातील, असे आम्ही मानतो. त्यांची कथा पालक बनण्याच्या पलीकडे जाऊन पालकत्वाच्या प्रवासात संगत आणि सहानुभूती नव्याने शोधण्याबद्दल आहे. आम्ही अतिशय आनंदाने आमच्या प्रेक्षकांसाठी बे दुणे तीन दिनांक 5 डिसेंबर रोजी सादर करीत आहोत.”

वृषांक प्रॉडक्शन्सच्या प्रतिनिधींनी सांगितले, “बे दुणे तीन ची संकल्पना तयार केली आम्ही प्रथम तयार केली तेव्हा आम्हाला प्रेम आणि जबाबदारी यांच्यातील नाजूक अंतर टिपायचे होते, तसेच तो काळ टिपायचा होता जिथे आयुष्यात नात्यातील ताकद पणाला लागली आहे, तरीसुद्धा त्याचा अर्थ अधिक खोलवर रुजलेला आहे. तीन बाळं होणार असे एका जोडप्याला समजल्याची कल्पना आयुष्याच्या अनिश्चिततेला आणि विनोदाला अगदी रूपक बनली. शो चालू असताना आपण पहाल की अगदी खऱ्या नात्यांप्रमाणेच एकाच वेळेस हसणे, निराशा आणि प्रेम एकत्र अनुभवायला मिळू शकतात. हे समप्रमाणात भावनिक, गंमतीशीर आणि प्रामाणिक आहे. मराठी झी5 सोबत या प्रकल्पावर काम करताना एक कल्पक समाधान अनुभवायला मिळाला, आणि आम्ही अतिशय उत्सुकतेने प्रेक्षकांसमोर ही पात्रे आणि त्यांचे अनागोंदी माजलेले, प्रेमाने भरलेले जग प्रस्तुत करण्याची वाट पाहत आहोत.”

अथर्व सौंदणकर आणि हिमांशू पिले या दिग्दर्शक जोडीने सांगितले की, “बे दुणे तीन च्या माध्यमातून जवळची असूनही चित्रपटासारखी वाटणारी कथा, जोडपे स्वतःमध्ये बघू शकतील असे काहीसे असणारी कथा सांगण्याचे आमचे ध्येय होते. अभय आणि नेहाचे नात्यात सुंदर पद्धतीने दोष भरले गेले आहेत; त्यात ते भांडतात, ते चुका करतात, पण खरे पाहता त्यांचे एकमेकांवर मनापासून प्रेम असते आणि आपोआप एकत्र जगायला शिकतात. कथेची रचना अनेक काळांदरम्यान सांगितली गेली आहे आणि हसणे, मन मोडणे ते पुन्हा मिलन होण्यापर्यंतचे बारकावे या त्यांच्या प्रवासातून दिसून येतात. साध्या क्षणांमधील विनोद आणि रोजच्या अनागोंदीखाली अनेकदा लपलेली मृदूता टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आम्हाला खूप उत्सुकता लागली आहे कारण आमच्या प्रेक्षकांना या मालिकेची भावनिक खोली आणि आत्मीयता अनुभवायला मिळणार आहे.”

क्षितीश दाते, जो अभयची भूमिका साकारत आहे, म्हणाला,”बे दुणे तीन ही खरोखरच वास्तवाच्या खूप जवळ वाटणाऱ्या कथांपैकी एक आहे. अभय हा एक असे पात्र आहे जो सर्वांगाने एकाच वेळी प्रेम, जबाबदारी, भीती आणि उत्साह यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे. हे पात्र साकारल्यामुळे मला अशा भावना अनुभवण्याची संधी मिळाली ज्यात नवख्या, गंमतीशीर आणि अतिशय संबंधित भावना होत्या. एका क्षणातच एक नव्हे तर तीन बाळांचा वडील बनण्याची कल्पना नैसर्गिक अनागोंदी माजवते आणि त्याचवेळी त्यामध्ये एक सुंदर हळवेपणा सुद्धा उघड करते. या मालिकेत काम करणे मनाला भिडणारी अनुभूती राहिली आहे, आणि प्रत्येक जोडपे आणि प्रत्येक कुटुंब अभय आणि नेहाच्या प्रवासात स्वतःचे थोडेसे तरी रूप पाहतील, असे मी खरोखर मानतो. मी खूप उत्साहित आहे कारण प्रेक्षकांना अखेर हा शो पाहायला मिळणार आहे आणि आमच्या जगाशी जोडता येणार आहे.”

बे दुणे तीन ही दिनांक 05 डिसेंबर 2025 पासून, खास मराठी झी5 वर, प्रसारित होणार आहे!  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading