महिंद्रा चार्ज_इनकडून 180 किलोवॅट अल्ट्रा-फास्ट चार्जिंग नेटवर्कचे उद्घाटन; 2027 पर्यंत 1000 चार्जिंग पॉइंट्स उभारण्याचे आश्वासन
मुंबई : 2027 च्या अखेरीस 1,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्ससह 180 किलोवॅट क्षमतेचे 250 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची महिंद्राची योजना आहे. कंपनीच्या चार्ज_इन अल्ट्राफास्ट चार्जिंग नेटवर्कद्वारे इलेक्ट्रिक मोबिलिटी अमर्यादित करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत भारतात सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या सरकारच्या प्राधान्याशी हे सुसंगत आहे.
बेंगळुरू-चेन्नई महामार्गावरील होस्कोट येथे, राष्ट्रीय महामार्ग 75वर आणि दिल्लीपासून सुमारे 50 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 44वर मुर्थल येथे दोन चार्ज_इन स्टेशन आधीच सुरू करण्यात आले आहेत. भारताचा हाय-स्पीड ईव्ही चार्जिंग बॅकबोन तयार करण्याच्या दिशेने महिंद्राचे हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे.
नलिनीकांत गोल्लागुंटा, मुख्य कार्यकारी अधिकारी – ऑटोमोटिव्ह विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा लि. आणि कार्यकारी संचालक, महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेड, म्हणाले, “इलेक्ट्रिक मोबिलिटी म्हणजे स्वच्छ, शाश्वत वाहतुकीच्या दिशेने एक मोठी चळवळ चालवणे. XEV 9e आणि BE 6, त्यांच्या प्रभावशाली, थेट 500 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लांबच्या प्रवासात ड्रायव्हर्स व्यवस्थित गाडी चालवतील याची खात्री करणे, चार्ज_IN द्वारे आमचे अल्ट्राफास्ट चार्जिंग नेटवर्क सर्व ईव्ही वापरकर्त्यांसाठी एक सुलभ नेटवर्क तयार करून, पारंपरिक ड्रायव्हिंगप्रमाणे लांब पल्ल्याच्या प्रवासाला सहज आणि विश्वासार्ह बनवण्यास मदत करेल. परिणामी ग्राहकांचा विश्वास आणि इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी प्रोत्साहन देईल.”
महिंद्राच्या अग्रगण्य Charge_IN नेटवर्कमध्ये केवळ 180 kW ड्युअल गन चार्जर असतील जे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह चार्जिंग देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. XEV 9e, BE 6 आणि आगामी XEV 9S 20 मिनिटांत 20 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम आहेत. ज्यामुळे चार्ज_IN नेटवर्क लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक प्रवासाला व्यावहारिक, कार्यक्षम आणि तणावमुक्त करेल.
Charge_IN स्टेशन्स प्रमुख महामार्ग कॉरिडॉरच्या बाजूला धोरणात्मकदृष्ट्या स्थित असतील. प्रत्येक स्टेशन रेस्टॉरंट्स, कॅफे यांसारख्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांसह जागा सामायिक करेल, ज्यामुळे ते प्रवाशांसाठी विश्रांतीचे देखील एक ठिकाण होईल. थोडक्यात, इलेक्ट्रिक कार वेगाने चार्ज होत असताना तुम्ही कॉफी पिऊ शकता.
महिंद्रा ई एसयूव्हीचे मालक चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी, चार्ज करण्यासाठी आणि पैसे देण्यासाठी महिंद्राच्या Me4U ॲपवरून Charge_IN चा उपयोग करू शकतात. ही जलद-चार्जिंग स्टेशन्स इतर ब्रँडच्या इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांसाठी “Charge_IN by Mahindra” ॲपद्वारे आणि इतर अग्रगण्य एग्रीगेटर प्लॅटफॉर्मद्वारे देखील प्रवेशयोग्य असतील. Me4U ॲपद्वारे, ग्राहक सध्या विविध चार्ज पॉइंट ऑपरेटर्सवर (Charge_IN सह) ~34,000 सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्सचा फायदा घेऊ शकतात.
