तुम्ही पाहायलाच हवी अशी हाईस्ट: एचडीएफसी सिक्युरिटीजतर्फे फसवणूकीबाबत जागरूकता करणाऱ्या क्रांतिकारक उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई : एचडीएफसी सिक्युरिटीजने ‘क्या आप तैयार हो?’ या आपल्या प्रमुख #KnowYourMoney उपक्रमाखालील राष्ट्रव्यापी सीएसआर प्रयत्नाला सुरुवात करत असल्याचे आज जाहीर केले. हा सर्वसमावेशक जागरूकता उपक्रम भारताच्या आर्थिक साक्षरता आणि लवचिकतेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध आहे. गुंतवणूक फसवणूक करणाऱ्यांकडून निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी, या मोहिमेत प्रभावी कथाकथन, ऑनलाइन नाविन्यपूर्णता आणि समाजापर्यंत पोहोच यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यायोगे आर्थिक साक्षरता सुलभ, आकर्षक आणि वैयक्तिक बनवली गेली आहे.
दंगल आणि छिछोरे यांसारख्या चित्रपटांचे मास्टरमाइंड तसेच यश आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी रामायण चित्रपटाचे पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली या मोहिमेत ‘फ्रॉडस्टर फॅमिली’च्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांच्या युक्त्या सादर करण्यात आल्या आहेत. ही काल्पनिक पण वास्तवाशी सुसंगत दुनिया समाजातील फसवणुकीचे खरे चित्र दाखवते. मनोज पाहवा, भुवन अरोरा, सपना सांद, श्रीकांत वर्मा, नूतन सूर्य, सिमरन शाह आणि सिद्धांत यांनी साकारलेल्या या व्यक्तिरेखा विनोदी अंगाने जाणाऱ्या आणि त्याचवेळी अगदी ओळखीच्या वाटणाऱ्या आहेत. त्यायोगे जागरूकतेला कृतीत रूपांतरित केले आहे. प्रत्येक फिल्ममधून भावनिक शोषणापासून ऑनलाइन फसवणुकीपर्यंतच्या ताज्या फसवणुकींच्या पद्धतींचे दर्शन घडते. त्यामुळे प्रेक्षक विचार आणि सावधगिरीकडे प्रवृत्त होतात.
“जेव्हा तुम्ही कुटुंबांना त्यांच्या कष्टाने मिळवलेल्या बचती फसवणुकीत गमावताना पाहता, तेव्हा लक्षात येते की जागरूकता ही ऐच्छिक गोष्ट नाही — ती अत्यावश्यक आहे,” असे नितेश तिवारी म्हणाले. “एचडीएफसी सिक्युरिटीजच्या #KnowYourMoney उपक्रमासोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे आम्ही कथाकथनाचा वापर करून भारताला गुंतवणूक फसवणुकीच्या सापळ्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही मोहीम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहितीपूर्ण, सजग आणि सुरक्षित राहण्यासाठी सक्षम बनवण्याबद्दल आहे. कारण वेगाने बदलणाऱ्या आर्थिक जगात सुरक्षेचे खरे साधन म्हणजे ज्ञान हेच आहे.”
पाच भागांच्या मिनी-सिरीजमधील पहिल्या दोन फिल्म here and here येथे पाहता येतील.
ही मोहीम ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यातून आर्थिक साक्षरतेचे महत्त्व फक्त माहितीपरच नव्हे तर अत्यावश्यक असल्याचे दाखवले गेले आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत सुरू झाल्यापासून #KnowYourMoney भारतातील सर्वात मोठ्या हायब्रिड आर्थिक साक्षरता उपक्रमांपैकी एक म्हणून विकसित झाले आहे. या प्रकल्पात बँकिंग, बजेटिंग, निवृत्ती नियोजन आणि फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासारखे महत्त्वाचे विषय समाविष्ट आहेत. हे ऑनलाइन साधनांसह प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे आयोजित करून सर्व समाजघटकांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतात.
पहिल्या नऊ महिन्यांत, #KnowYourMoney उपक्रमाने आपल्या बहुभाषिक आशय, सामुदायिक कार्यक्रम आणि शिक्षण माध्यमातून दर आठवड्याला सुमारे 1.1 कोटी भारतीयांपर्यंत पोहोच वाढवली आहे. या उपक्रमाचे प्रशिक्षण मॉड्यूल्स 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये गेमिफाइड मायक्रो-लर्निंग अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यायोगे वापरकर्ते आपल्या गतीने मूलभूत आर्थिक साक्षरता प्राप्त करू शकतात.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे EVP आणि CMO पुनीत बेकल म्हणाले: “गुंतवणूक फसवणुकीचा व्याप आणि गुंतागुंत वाढली असून यापासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे जागरूकता. #KnowYourMoney आणि ‘क्या आप तैयार हो?’ च्या माध्यमातून आम्ही एक अशी चळवळ निर्माण करत आहोत ज्यामुळे भारतीयांना फक्त आपले पैसे सुरक्षित ठेवता येतील एवढेच नाही तर माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील. ही मोहीम शिकण्याची आणि उत्सुकतेची भावना जागृत करण्यासाठी मनोरंजनाच्या शक्तीचा वापर करते आणि प्रतिबंधाची ताकद लोकांच्या स्वतःच्या हातात देते. आमच्या 25 वर्षांच्या परंपरेशी प्रामाणिक राहून हा आमच्या गुंतवणूकदारांना जबाबदारीने गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ही केवळ एक मोहीम नाही तर आर्थिक सुरक्षिततेकडे वाटचाल करणारी एक चळवळ आहे.”
एचडीएफसी सिक्युरिटीजने वॅगन लर्निंग लिमिटेड, एम्पोहर इंडिया आणि अक्सेस लाइव्हीलीहुड्स फौंडेशन या तीन विशेष संस्थांशी भागीदारी केली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा विस्तार शहरी आणि ग्रामीण भारतभर झाला आहे. या भागीदारींमुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल आणि प्रत्यक्ष वर्गांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यातून महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमधील समुदायांपर्यंत पोहोच साधली गेली आहे. हजारो हँडबुक्स आणि शिक्षण किट्स वितरित करण्यात आले आहेत, हजाराहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी तसेच ग्रामीण समुदाय नियमितपणे आर्थिक साक्षरतेवरील रचनाबद्ध सत्रांना उपस्थित राहत आहेत. आगामी महिन्यांमध्ये, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (DGT) च्या भारत स्किल्स पोर्टलद्वारे तसेच गिग वर्कर्स, महिला उद्योजक, घरात काम करणारे कर्मचारी आणि इतरांसाठी विशेष प्रशिक्षण आणि सहभागातून 22 राज्यांमधील 14,000 महाविद्यालयांपर्यंत पोहोच साधण्याचे आहे.
अशा सुसूत्र कार्यक्रमांना पूरक म्हणून मोहिमेचा सर्जनशील विस्तार यांची स्वाभाविक अस्सलता आणि सांस्कृतिक संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय आहे. बेअर अँड बुल ही कॉमिक स्ट्रिप मालिका इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती या चार भाषांमधील राष्ट्रीय दैनिकांमध्ये प्रकाशित होते. दररोजच्या छोट्या मांडणीमधून गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना विनोदी पद्धतीने स्पष्ट केल्या जातात. मोहिमेमध्ये देशातील अग्रगण्य वित्तीय पत्रकार आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्या सहभागाने तयार केलेली पॉडकास्ट मालिका देखील आहे. यात ते फसवणुकीच्या वास्तविक उदाहरणांवर चर्चा करून गुंतवणूकदारांना उपयुक्त सल्ला देतात.
ऑफलाइन कृतींच्या स्वरूपात ‘स्कॅम ऑर नॉट’ हा प्रस्तावित चॅलेंज गेम, मेट्रो शहरांतील आणि महाविद्यालयांतील सामुदायिक स्पर्धा, ‘इन्व्हेस्टमेंट हाईस्ट’ नावाचा आगामी कलेक्टिबल कार्ड गेम आणि नागरिकांना फसवणुकीची चिन्हे ओळखता येईल आणि आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवता येईल असे लवकरच प्रकाशित होणारे फ्रॉडस्टर्स डोसीयर हे एक सखोल मार्गदर्शक यांचा समावेश आहे.
द स्क्रिप्ट रूमचे सहसंस्थापक अय्यप्पन राज यांनी या मोहिमेवर काम केले आहे. ते म्हणाले, “फसवणुकीची संकल्पना जणू काही इंटरनेटवरील संगणक आणि यंत्रांनी तयार केली आहे असे वाटते. पण तसे नाही. ही काही माणसांचीच कृती आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट गुंतवणूक फसवणुकीला मानवी रूप देणे होते. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्याशी जोडला जाईल, समजून घेईल आणि दैनंदिन जीवनात सतर्क राहील. जाहिरातीतील चालू आणि चित्रविचित्र प्रवाहापासून दूर राहून आम्ही पारंपरिक कथाकथनाची शैली निवडली. नितेश तिवारी आणि अर्थस्कायच्या टीमचे मनःपूर्वक आभार. त्यांनी या पटकथांना इतक्या प्रभावी आणि मोहक पद्धतीने साकारले. तसेच उत्कृष्ट क्लायंट आणि सहकारी म्हणून या प्रवासात उत्तम साथ देणाऱ्या एचडीएफसी सिक्युरिटीजच्या टीमचेही मनापासून आभारी आहोत.”
ही मोहीम ज्या नागरिकांनी फसवणुकीच्या घटना ओळखल्या आणि त्यांना थोपवण्यात यश मिळवले अशा नागरिकांचाही गौरव करते आहे. त्यांच्या वास्तव कथांचा वापर करून जागरूकता शक्य आहे आणि सावधगिरी आत्मसात केली जाऊ शकते हे दाखवते. या कथांद्वारे ‘क्या आप तैयार हो?’ एक प्रभावी संदेश पुन्हा अधोरेखित करते — आर्थिक पार्श्वभूमी किंवा अनुभव काहीही असो, प्रत्येकजण फसवणुकीविरुद्ध लढणारा योद्धा होऊ शकतो.
