क्रेडिटबीने महाराष्ट्रात उजळवली दिवाळी, कुटुंबांना दिला निर्धास्त सेलीब्रेशनचा आधार
पुणे : भारतातील अग्रगण्य ऑनलाइन क्रेडिट सोल्यूशन प्रदाता क्रेडिटबी आपली पोहोच महानगरांबरोबरच टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही सातत्याने वाढवत आहे, सध्याच्या 5.59 कोटी कर्ज खात्यांसह, कंपनी देशभरातील विविध आणि झपाट्याने वाढणाऱ्या ग्राहकवर्गाला सेवा पुरवली आहे.
अलीकडेच ब्रँडने आपला नवीन दिवाळी कॅम्पेन ‘हर तरक्की में साथ’ लॉन्च केला, ज्यातून क्रेडिटबी कसे व्यक्ती आणि कुटुंबांना कोणत्याही तडजोडीशिवाय पुढे जाण्यास सक्षम करत आहे हे दाखवले आहे. केवळ महाराष्ट्रातच या प्लॅटफॉर्मद्वारे एकूण 11,000 कोटीं रुपये कर्जवितरण झाले असून, 70 लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यात आली आहे. यात 25-34 वयोगटातील ग्राहक सर्वाधिक सक्रिय असून, तरुण व्यावसायिक डिजिटल क्रेडिटला उत्साहाने स्वीकारत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की ते स्वत:ची प्रगती साधण्यासाठी आणि आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिजिटल कर्जसेवा मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत.
क्रेडिटबीचे सह-संस्थापक व सीईओ, मधुसूदन ई. म्हणाले: “भारताचे डिजिटल लेंडिंग इकोसिस्टम प्रगत होत असताना, नव्याने उभ्या राहत असलेल्या शहरांमध्ये डिजिटल कर्जसेवांचा उल्लेखनीय स्वीकार दिसून येत आहे. या शहरांतील लोकांच्या आकांक्षा झपाट्याने वाढत आहेत आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी ते जबाबदार, तंत्रज्ञानावर आधारित कर्जसेवा स्वीकारत आहेत. क्रेडिटबीमध्ये आम्ही देशभरातील 8 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देताना अभिमान बाळगतो. टियर-2 आणि टियर-3 बाजारपेठांमधील वाढती मागणी दाखवते की ग्राहक केवळ सणासुदीच्या काळासाठीच नव्हे, तर दीर्घकालीन प्रगतीसाठीही डिजिटल कर्जसेवांचा वापर करत आहेत. आम्ही आपली पोहोच सतत वाढवत असताना, आमचा भर व्यक्ती आणि कुटुंबांना कोणत्याही तडजोडीशिवाय प्रगती साजरी करण्यास सक्षम करण्यावरच राहील.”
ब्रँडची ही मोहीम सणासुदीच्या आकांक्षांवर आधारित सहज आणि संबंधित विनोदी शैलीत ग्राहकांशी जोडण्यासाठी तयार केली गेली आहे. या माध्यमातून क्रेडिटबीने स्वत:ला विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून अधोरेखित केले आहे – जे कुटुंबांना जीवनशैली उन्नत करण्यासाठी, स्वप्नपूर्तीच्या दिशेने अर्थपूर्ण पावलं टाकण्यासाठी आणि कोणतीही तडजोड न करता सण साजरे करण्यास सक्षम करते.
या मोहिमेत क्रेडिटबीचे पर्सनल लोन, टू-व्हीलर लोन आणि बिझनेस लोन या ऑफरिंग्ज दाखवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना केवळ सणासुदीच्या काळातच नव्हे तर भविष्यातील आर्थिक गरजांसाठीही आधार मिळतो.
मुख्य लेंडिंग सेवांव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्मवर 24K डिजिटल गोल्ड आणि क्रेडिट रिपोर्ट सोल्यूशन्स यांसारख्या मूल्यवर्धित सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांच्या बदलत्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जातात.
तंत्रज्ञानाधारित दृष्टिकोन आणि भारताच्या विविध लोकसंख्येच्या गरजांची समज याच्या आधारे, क्रेडिटबी कोट्यवधी भारतीयांना जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह कर्जसुविधा देण्याच्या आपल्या ध्येयाला पुन्हा अधोरेखित करत आहे. यामुळे लोकांना त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण आत्मविश्वासाने साजरे करता येतात.
