Thursday, October 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात दसऱ्यानिमित्त तीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

पुणे – पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळ येथे यंदा 30 फुटी रावणाची प्रतिकृती बनवण्यात आली होती. ओला दुष्काळ, अत्याचारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, दहशतवाद अशा रूपात्मक रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. पुणे शहरातून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रावण दहन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. यावेळी हवेत रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. अशी माहिती पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी दिली. उत्सव प्रमुख डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक शुभांगी सातपुते होते.

Leave a Reply