Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

कल्पतरूकडून आयपीओ पूर्वी प्रमुख गुंतवणूकदारांकडून 708 कोटी रु. निधीची उभारणी

 

रिअल इस्टेट विकसक कल्पतरू लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीपूर्वी (आयपीओ) एक दिवस आधी प्रमुख अँकर गुंतवणूकदारांकडून 708 कोटी रु. उभारले आहेत. कल्पतरू लिमिटेडचा आयपीओ 24 जून रोजी खुला होत असून यामार्फत 1,590 कोटी रु. उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. ही इश्यू प्रक्रिया 26 जून रोजी समाप्त होईल.

बीएसईच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या परिपत्रकानुसार, कल्पतरूने 1.71 कोटीहून अधिक इक्विटी शेअर्सचे प्रती 414 रु. या आयपीओ प्राइस बँडच्या उच्च टप्प्यावर वाटप केले आहे. सिंगापूरमधील स्वतंत्र संपत्ती निधी कंपनी GIC आणि बैन कॅपिटलसह नऊ अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने 708 कोटी रु. उभारले आहेत असे कल्पतरूकडून सांगण्यात आले.

कंपनीच्या शेअर्सचे ज्यांना वाटप करण्यात आले त्यात एसबीआय म्युच्युअल फंड (MF), आयसीआयसीआय प्रुडेन्शियल MF, 360 ONE ग्रुप, आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स, टॉरस MF आणि आयुष्मत लिमिटेड यांचा समावेश आहे.

कंपनीने आयपीओ साठी प्रती शेअर 387 रु. ते 414 रु. असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

नवीन रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसप्रमाणे, मागील आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत, कंपनीने निवासी व व्यावसायिक मालमत्तेची वाढती मागणी असल्याने 2,727.24 कोटी रु. किमतीची मालमत्ता विक्री केली. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 3,201.98 कोटी रु. किमतीची मालमत्ता विक्री केली आहे.

मुंबईस्थित कल्पतरू ही निवासी, व्यावसायिक, रिटेल व इंटिग्रेटेड टाउनशिप प्रकल्पांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. तसेच, ही कंपनी सोसायट्यांचे पुनर्विकास प्रकल्प देखील हाती घेते.

कंपनीच्या आयपीओमध्ये पूर्णतः इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा असून त्यामार्फत 1,590 कोटी रु. उभारले जाणार आहेत. यामध्ये कोणताही “ऑफर फॉर सेल” (OFS) भाग नाही. या निधीचा उपयोग कर्ज परतफेड आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी करण्यात येणार आहे.

सुमारे 8,500 कोटी रु. मूल्य असलेल्या या कंपनीकडे जवळपास 50 दशलक्ष चौरस फूटचा मोठा प्रकल्प पोर्टफोलिओ आहे. यामध्ये 25 दशलक्ष चौरस फूट चालू प्रकल्प, 16 दशलक्ष चौरस फूट आगामी प्रकल्प आणि सुमारे 8 दशलक्ष चौरस फूट नियोजनाच्या पातळीवर असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे.

कल्पतरू ही देशातील आघाडीची रिअल इस्टेट विकसक कंपनी असून महाराष्ट्रातील मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) मध्ये कंपनीने लक्षणीय स्थान मिळविले आहे. स्थापनेपासून आजपर्यंत कंपनीने 75 प्रकल्प पूर्ण केले असून, यामध्ये 16 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा समावेश आहे. जरी कंपनीचे बहुतेक प्रकल्प MMR व पुणे (महाराष्ट्र) येथे असले तरी, हैदराबाद (तेलंगणा) व नोएडा (उत्तर प्रदेश) येथेही कंपनीचे प्रकल्प आहेत.

कल्पतरू ग्रुपची स्थापना 1969 मध्ये मोफतराज पी. मुनोत यांनी केली होती.

या समूहाने विविध देशांमध्ये आपले स्थान निर्माण केलेले असून वीज वहन व वितरण, तेल व वायू, रेल्वे, नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प, वेअरहाऊसिंग व लॉजिस्टिक्स, तसेच फॅसिलिटी मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये EPC करार यामध्ये कामकाज चालते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading