आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे सुपर टर्म प्लॅन सादर
मुंबई : आदित्य बिर्ला कॅपिटल या भारतातील अग्रगण्य वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनीची जीवन विमा उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“ABSLI”) ने ABSLI सुपर टर्म प्लॅन सादर करत असल्याची घोषणा केली आहे. हे सर्वसमावेशक प्युअर प्रोटेक्शन टर्म इन्शुरन्स उत्पादन अंगभूत आरोग्य व्यवस्थापन सेवांसह उद्दिष्टांशी संलग्न आर्थिक संरक्षण देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या सादरीकरणातून कंपनीचा ग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि विमाधारकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी असलेली बांधिलकी प्रतिबिंबीत होते.
ABSLI सुपर टर्म प्लॅन तीन प्रकारच्या सानुकूलित कव्हरेज पर्यायांची लवचिकता देते:
- लेव्हल कव्हर – पॉलिसी कालावधीत निश्चित विमा रक्कम पुरवते. ती विमाधारकाच्या मृत्यूनंतर एकरकमी, मासिक उत्पन्न किंवा दोघांचे मिश्रण या रूपात दिली जाऊ शकते.
- इन्क्रिजिंग कव्हर – कालांतराने वाढते संरक्षण देत विमा रक्कम (सम अॅश्युअर्ड) दरवर्षी 5% (साधा व्याजदराने) वाढते.
- लेव्हल कव्हर विथ रिटर्न ऑफ प्रीमियम – मृत्यू लाभ निश्चित करते. विमाधारक पॉलिसी कालावधी पूर्ण करत असल्यास एकूण भरलेले प्रीमियम 100% परत मिळते.
मजबूत जीवन संरक्षणासोबतच हा प्लॅन पॉलिसी कालावधीत अंगभूत आरोग्य व्यवस्थापन सेवा देतो. त्या विमाधारकांना आरोग्याचे सक्रियपणे परीक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम करतात आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतात. याशिवाय, एनहान्स्ड लाईफ स्टेज प्रोटेक्शन हा पर्याय उपलब्ध आहे. त्यायोगे विवाह, अपत्यप्राप्ती किंवा गृहकर्ज अशा आयुष्यातील महत्वपूर्ण घटनांच्या वेळी विमा रक्कम वाढवता येते. अर्थात जर हा पर्याय सुरुवातीला निवडलेला असेल आणि इतर निकष पूर्ण झाले असतील तर हे लागू होते.
आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कमलेश राव म्हणाले, “ABSLI मध्ये, आम्ही व्यक्ती व कुटुंबांना चिरकालीन संरक्षण व मन:शांती देऊन सक्षम करणाऱ्या विमा उपाययोजना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ABSLI सुपर टर्म प्लान ही काळजीपूर्वक डिझाइन केलेली योजना आहे. ती लवचिक कव्हरेज, अंगभूत आरोग्य व्यवस्थापन सेवा आणि गंभीर आजार किंवा अपंगत्वासारख्या जीवनातील अनिश्चिततेपासून संरक्षण देऊन व्यापक आर्थिक सुरक्षा पुरविते.”
ABSLI सुपर टर्म प्लॅन इन्स्टंट पेमेंट ऑन क्लेम इंटीमेशन सुविधा पुरविते. या अंतर्गत क्लेम नोंदणी झाल्यानंतर एका कामकाज दिवसामध्ये ठराविक रक्कम दिली जाते. प्लॅनमध्ये मृत्यू लाभाच्या वितरणामध्येही अधिक लवचिकता दिली आहे. पॉलिसी घेताना, ग्राहक खालील तीन पे-आउट पर्यायांपैकी एक निवडू शकतात: एकरकमी रक्कम, समान मासिक उत्पन्न किंवा दोघांचे मिश्रण (म्हणजे उत्पन्न + एकरकमी).
जोडीला स्टँगर्ड डेथ बेनीफिट पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीस पाच वर्षांच्या कालावधीत मासिक हप्त्यांमध्ये लाभ मिळतो. शिवाय, प्लॅनमध्ये Commutation of Income Benefit देखील आहे. त्याअंतर्गत नामनिर्देशित व्यक्ती मासिक उत्पन्नाचे पेआउट इनकम बेनीफिट कालावधीत कोणत्याही वेळी एकरकमी रकमेच्या स्वरूपात रूपांतरित करू शकतात.
