Wednesday, May 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात राजकीय खलबते?

मुंबई: प्रतिनिधी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीने ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यतेला सुरुंग लागणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

आज सकाळी दहा वाजता पंचतारांकित हॉटेल ताज लँड एंडच्या दारातून राज ठाकरे यांची गाडी आत शिरली आणि काही वेळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी पोहोचला. यावेळी राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात राजकीय खलबते झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीत फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला का, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 

आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जिल्हा प्रमुख आणि उप जिल्हा प्रमुख यांची बैठक बोलावली आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे हे मनसे शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील खलबते जिज्ञासा वाढवणारी ठरली आहे. 

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या विधानामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यातील वाद नगडणे असल्याचे विधान करून या चर्चेत रंगत निर्माण केली. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची मन:स्थिती देखील या युतीला अनुकूल असल्याचे सांगितले जाते.

राज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आले तर राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील, अशी ग्वाही देतानाच युतीसाठी शिवसेनेकडून ठोस प्रस्ताव यावा किंवा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading